नंदुरबारात अंमली पदार्थ विरोधी अभियानास सुरुवात..!!

0
204

नंदुरबार :०४/०३/२०२३

दिनांक 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षक यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्स दरम्यान नाशिक परिक्षेत्रातील सर्व पाचही जिल्ह्यात कम्युनिटी पोलीसिंग अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी अभियान सुरु करणे बाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधीक्षक यांना आवाहन केले होते.

7 1
01

त्याअनुषंगाने नाशिक परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवावी अशी संकल्पना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी मांडली होती.
जनजागृती मोहीम राबवितांना जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, संस्था इत्यादी ठिकाणी जनजागृती म्हणून निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सायकल रॅली, भाषण स्पर्धा, पथनाट्य इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
तसेच त्याच प्रमाणे तरूण वयोगटातील विद्यार्थी व पालक यांचेत एकत्रित चर्चासत्र संवादसत्राचे आयोजन करण्यात यावे. तसेच विविध नाविन्यपूर्ण योजनांचा वापर करुन अंमली पदार्थ विरोधी अभियान राबवावे.
त्यातून घर, शाळा, परिसर, शासकीय कार्यालय, संस्था, जिल्हा व पर्यायाने राज्य अंमली पदार्थमुक्त कसे राहील याबाबत प्रयत्न करावे असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधीक्षकांना केले होते.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी केलेल्या आवाहनास 24 तासाचे आत प्रतिसाद म्हणून नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी नाशिक परिक्षेत्रात सर्वप्रथम अंमली पदार्थ विरोधी अभियान सुरु करून जिल्हा घटकात अभियानाची दमदार सुरुवात करण्याचा संकल्प मांडला.
त्यांचे हस्ते दिनांक 01 मार्च 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर नंदुरबार येथे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी अभियानाची सुरूवात करण्यात आली.
दीपप्रज्वलन करून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
तर नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी अंमली पदार्थांचे दुषपरिणाम व किशोरवयात या गोष्टी मुलांना समजावून सांगितल्यास त्याचे काय फायदे होतात याबाबत मार्गदर्शन केले.
पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी उपस्थीतांना अंमली पदार्थ विरोधी संकल्पनेची शपथ दिली.

6 1
02

नंदुरबार जिल्हा घटकाने 24 तासापेक्षा कमी कालावधीत प्रतिसाद देवून “अंमली पदार्थ मुक्त जिल्हा” अभियानाची सुरुवात केल्याबद्दल त्यांनी पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांचे अभिनंदन केले. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने केलेला “SAY NO TO DRUGS” “अंमली पदार्थ मुक्त” जिल्हा हा संकल्प पुढे जावो असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
अंमली पदार्थ विरोधी अभियानाच्या या कार्यक्रमाप्रसंगी पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, जी.टी.पी महाविद्यालय, श्रॉफ हायस्कुल, एस.ए. मिशन हायस्कुल, भामरे क्लासेस, अभिनव विद्यालय, पी.जी. पब्लिक स्कुल या शाळा व महाविद्यालयांचे सुमारे 1 हजार विद्यार्थी उपस्थित होते .

हे हि पहा:

तसेच मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहूल पवार, नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, उपनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here