नंदुरबार -७/४/२३
राज्यातील आरोग्य सुविधा बळकट व्हावी यासाठी शासनाने “सुंदर माझा दवाखाना” हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यातील लहान शहादा या गावातून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आले

या योजनेमुळे जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालय, प्राथमिक केंद्र, उपकेंद्र, अवस्था चांगल्या पद्धतीने सुधारणार आहेत आणि या ठिकाणी लागणारे नवीन साहित्य बसविण्यात येणार आहे.

आरोग्याच्या समस्यासाठी सामान्य नागरिकांना गाव पातळीवरून जिल्ह्याच्या ठिकाणावर याव लागत. मात्र या उपक्रमामुळे आता गाव, पाड्यात सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना याचा मोठा फायदा होणार आहे.
“सुंदर माझा दवाखाना” साठी श्रमदानातून, सीएसआर फंडातून, जिल्हा परिषदेच्या शेष निधीतून, आरकेएस निधीतून निधी रुग्णालयांना दिला जाणार आहे, तर NGO यांनी संस्था दत्तक घेऊन त्यात सुधारणा करण्यासाठी मदत करणार आहेत.

या योजनेसाठी जिल्हा परिषदेची मोठी मदत होणार आहे. त्यामुळे आता आरोग्याच्या समस्या थेट आपल्या गावपाड्यांवरच मिळणार आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
“सुंदर माझ्या दवाखाना” या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा आरोग्य अधिकारी गोविंद चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी, लहान शहादा केंद्रातील डॉक्टर, सरपंच, उपसरपंच आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रवींद्र राजपूत ,कोळदा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज..