नंदुरबार बाजार समिती : सभापती, उपसभापती निवड बिनविरोध

0
259

आमचे ‘दगडधोंडे’ सर्वच रत्नांवर भारी पडले : चंद्रकांत रघुवंशींची प्रतिक्रिया

नंदुरबार :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी व उपसभापती पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. यात सभापतिपदी विक्रमसिंग वळवी तर उपसभापतीपदी वर्षा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड होताच चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह त्यांच्या असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. नंदुरबार कृउबावर शिवसेना ( शिंदे गटाचा ) झेंडा फडकला आहे.

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय संपादन करीत १८ पैकी १७  जागांवर उमेदवार निवडून आले होते तर हमाल मापाडी मतदारसंघातुन अपक्ष उमेदवार अशोक आरडे यांनी पाठिंबा दिल्याने सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया एकतर्फी झाली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

आज गुरुवार १८ मे रोजी बाजार समितीच्या सभागृहात जिल्हा सहाय्यक उपनिबंधक भारती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. सहाय्य कृऊबाचे सचिव योगेश अमृतकर यांनी केले. विहित मुदतीमध्ये सभापतीपदासाठी विक्रमसिंग वळवी तर उपसभापती पदासाठी वर्षा पाटील यांच्या एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवड झाल्यानंतर शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी नवनियुक्त सभापती, उपसभापतींच्या सत्कार केला.

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचे बंधू प्रकाश गावित यांच्या पराभव विक्रमसिंग वळवी यांनी केल्याने यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ घालून शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी खेळी केल्याची चर्चा जिल्हाभरात सुरु आहे. तर जिल्ह्यात पाच कृषी उत्पन्न बाजार बाजार समित्यांमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे संचालक आहेत. नंदुरबार, नवापूर, धडगाव मध्ये सभापती, उपसभापतींचे निवड झाली. मतदारांनी बाजार समिती निवडणुकीत मोठा विश्वास दाखवलेला आहे. सर्व संचालक मंडळ शेतकरी, हमाल मापाडी व जनतेशी निगडित असलेली कामे प्रामाणिक करतील. एकीकडे विकासरत्न, संसदरत्न, जिल्हारत्न विरोधकांकडे असतांना आमचे ‘दगडधोंडे’ सर्वच रत्नांवर भारी पडल्याची प्रतिक्रिया माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निवडीनंतर दिली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यावेळी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, जि.प. चे माजी अध्यक्ष वकील पाटील, पालिकेचे माजी सभापती कैलास पाटील माजी नगरसेवक परवेज खान, रवींद्र पवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कृष्णदास पाटील, तालुका प्रमुख डॉ.सयाजीराव मोरे यांच्यासह विविध गावातील सरपंच, उपसरपंच व बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here