बालविवाह रोखण्यासाठी गेलेल्या पथकाला विरोध ; गुन्हा दाखल
नंदुरबार: जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात “ऑपरेशन अक्षदा” मोहीम राबविण्यात येत आहे. यास जिल्हाभरातून चांगला प्रतिसादात मिळत असून निश्चितच होणारे बालविवाहना आळा बसला आहे. पोलीस अधीक्षकांच्या या मोहिमेचे कौतुक होत आहे. दरम्यान, नंदुरबार तालुक्यातील नागसर येथे होणारा बालविवाह रोखण्यासाठी गेलेल्या पथकाला विरोध करत पोलीसांना धक्काबुकी केल्याची घटना घडली असून शासकीय वाहनाचे नुकसान करुन पोलीसांच्या अंगावर धावून येत शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या जमावाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नंदुरबार तालुक्यातील नागसर येथे बालविवाह होणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे हे पथकासह दि.१२ मे रोजी दुपारी ११ ते १२ वाजेच्या सुमारास नागसर येथे रवाना झाले. याप्रसंगी बालविवाह करु नये असे आवाहन पोलीस पथकाच्या वतीने करण्यात आले. यावेळी तेजमल रमेश पवार, पिंट्या रोहिदास चव्हाण (दोन्ही रा.बद्रीझिरा ), कनिलाल रजेसिंग पवार (रा.नागसर) यांच्यासह सुमारे १५ ते २० जणांनी बेकायदेशीररित्या जमाव जमवून पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करण्यात आली. तसेच शासकीय वाहने फोडून पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे व पोना.विनायक सोनवणे यांना मारहाण करण्याची धमकी दिली व अंगावर धावून गेले.
दरम्यान, जमावाच्या धक्काबुकी त विनायक सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे जखमी झाले आहेत. याबाबत पोना विनायक सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन संशयित तेजमल पवार, पिंट्या चव्हाण, कनिलाल पवार यांच्यासह सुमारे १५ ते २० जणांच्या जमावाविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार करत आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.