NANDURBAR : अवैध विदेशी दारुच्या वाहतूकीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची कारवाई..

0
288

18 लाख 70 रुपये किमतीच्या दारूसह एकुण 45 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार -१४/७/२३

गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेल्या नंदुरबार जिल्हयातुन मध्यप्रदेश, हरियाणा व गोवा राज्यातील दारूची गुजरात राज्यात तस्करी होत असल्याच्या तक्रारी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना प्राप्त झाल्या होत्या. मा. पोलीस अधीक्षक सो, यांना प्राप्त झालेल्या तक्रारी वरुन त्यांनी नंदुरबार जिल्हयातील सर्व प्रभारी अधिकारी यांना अवैध दारूची तस्करी करणा-या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

दिनांक 12/07/2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना एक पिकअप व एक इनोव्हा या वाहनांमधुन नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरात अवैध दारू घेवून येणार आहे अशी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली. त्यावरुन त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना सदर वाहनाची माहिती देवून, बातमीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले

मिळालेल्या बातमीच्या आधारे नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर हे स्वतः त्यांच्या दोन वेगवेगळ्या पथकासह नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरात रोडवर सापळा रचला व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची बारकाईने तपासणी करीत असतांना दिनांक 12/07/2023 रोजी सकाळी 04.30 वा. सुमारास एक चारचाकी मोठे वाहन व त्याच्या पाठीमागे एक इनोव्हा वाहन भरधाव वेगाने येतांना दिसला, म्हणून पोलीस पथकातील अमलदारांनी हातातील टॉर्चच्या सहाय्याने वाहन उभे करण्याचा इशारा दिला असता वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघून गेले, म्हणून पथकाला संशय आल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग केला. परंतु वाहन चालकास संशय आल्याने त्याने पोलीसांपासून काही अंतरावर वाहन उभे करून वाहन सोडून पळ काढला. वाहन चालकांचा नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास नाव गाव विचारले असता शिवाजी बाबुलाल चौधरी वय 29 वर्षे रा. पडावद ता. शिंदखेडा जि. धुळे ह.मु. जगतापवाडी नंदुरबार, असे असे सांगून त्याचा एक साथीदार पळून गेला. महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH-39 C-7306 या वाहनाची तपासणी केली असतात्यात खालील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल आढळून आला.

1) 14,40,768/- रू किंमतीचे एकुण 256 खाकी रंगाच्या पृष्ठाचे बॉक्स त्यावर MALT WHISKY असे इंग्रजीत लिहलेले सदर बॉक्स उघडुन पाहीले असता प्रत्येकी बॉक्स मध्ये ROYAL BLUE MALT WHISKY 180 M.L. PIGGOT CHAPMAN AND CO असे लेबल असेलेले प्लॉस्टीकच्या सिलबंद बाटल्या एकुण 48 नग त्याचप्रमाणे एकुण 12 पॉलेथिन थैली प्रत्येकी थैली एकुण 48 नग नमुद वर्णनाच्या व्हिस्कीच्या बाटल्या अश्या एकुण सर्व 12,864/- नग बाटल्या प्रत्येकी बाटलीची किंमत 112 रुपये
कि. अं.प्रमाणे

2)6,00,000/- रु महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH-39-C-7306 असे असलेले जु.वा.कि.अ.
एकुण -20,40,768/- रुपये

सदर मुद्देमाल, पिकअप वाहन ही पोलीसांनी कायदेशीर प्रक्रीया करून ताब्यात घेतली. सदरची दारू कोणाची आहे ? याबाबत ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास विचारणा केली असता त्याने सदरचा माल हा जगतापवाडी मध्ये राहणार मुकेश चौधरी याचा असले बाबत सांगीतले. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाकडून मुकेश चौधरी याची माहिती घेवून त्याचा शोध घेतला असता तो जगतापवाडी येथे त्याच्या राहत्या घरी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गावा विचारले असता मुकेश अर्जुन चौधरी, वय 33 वर्षे, रा. म्हसावद, ता. शहादा, जि. नंदुरबार, ह.मु. जगतापवाडी, नंदुरबार ता जि नंदुरबार असे सांगीतले. त्यावेळी त्याच्या घरासमोर उभी असेलेली टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा पांढऱ्या रंगाची क्रमाकं MH-43 V-6354 वाहनाबाबत विचारले असता सदरची गाडी ही त्याचीच असलेबाबत सांगीतले. तिची पाहणी केली असता त्यात खालील वर्णनाचा माल मिळुन आला तो –

3) 4,30,080/- रू किंमतीचे एकुण 80 खाकी रंगाचे पृष्ठाचे बॉक्स त्यावर MALT WHISKY असे इंग्रजीत लिहलेले सदर बॉक्स उघडुन पाहीले असता प्रत्येकी बॉक्स मध्ये ROYAL BLUE MALT WHISKY 180 M.L.PIGGOT CHAPMAN AND CO असे लेबल असेलेले प्लॉस्टीकच्या सिलबंद बाटल्या एकुण 48 नग नमुद वर्णनाच्या व्हिस्कीच्या बाटल्या अश्या एकुण सर्व 3840/- नग बाटल्या प्रत्येकी बाटलीची किंमत 112 रुपये कि. अं. प्रमाणे

4) 21,00,000/- रु टोयोटा कंपनीचे इनोव्हा तिचा क्रमाकं MH-43- V-6354 असे असलेले जु.वा.कि.अ. एकुण -25,30,080/- रुपये..

ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही इसमांच्या वाहनातून एकुण 18 लाख 70 हजार रुपये किमतीची अवैध विदेशी दारु व 27 लाख रुपये किमतीचे दोन चारचाकी वाहने असा एकुण 45 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करुन ताब्यात घेण्यात आलेले व पळुन गेलेल्या एका इसमाविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 601/2023 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई), 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश् तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत पाटील, पोलीस उप निरीक्षक श्री. विकास गुंजाळ, पोलीस हवालदार जगदीश पवार, राजेश येलवे, दिपक गोरे, पोलीस नाईक भटु धनगर, बलविंद्र ईशी, स्वप्नील पगारे, नरेंद्र चौधरी, पोलीस अंमलदार किरण मोरे, इम्राण खाटीक, राहुल पांढारकर, अनिल बड़े, युवराज राठोड यांच्या पथकाने केली आहे.

प्रवीण चव्हाण ,जिल्हा प्रतिनिधी ,नंदुरबार ,एम डी टी व्ही न्यूज ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here