Nandurbar News : भाजपा महिला मोर्चाची जोडो मारो आंदोलन BJP Mahila Morcha’s Jodo Maro Movement

0
239

Nandurbar News – भाजपा महिला मोर्चाच्या नंदुरबार शहर आणि जिल्हा शाखांमध्ये आज मोठा मारुती चौकात जोडो मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा जिल्हाध्यक्ष श्री निलेश माळी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे खासदार धीरज प्रसाद सानू यांच्याकडे 300 कोटींची रोख बेहिशेबी रक्कम सापडली यांच्या निषेधार्थ भाजपा नंदुरबार शहर व भाजपा महिला मोर्चाच्या तर्फे जोडो मारो आंदोलन करण्यात आले

काँग्रेसचे खासदार धीरज प्रसाद सानू यांच्याकडे 300 कोटींची रोख बेहिशेबी रक्कम सापडल्याची बातमी सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. ही रक्कम काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची आणि बेकायदेशीर कामगिरीची साक्ष देत आहे. या निषेधार्थ भाजपा महिला मोर्चाच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

image

: हेही वाचा :

यावेळी उपस्थित भाजपा महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनी काँग्रेसला 300 कोटींच्या बेहिशेबी रक्कमेची आठवण करून दिली.

या आंदोलनाला भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, महामंत्री सुदानंद रघुवंशी, जिल्हा महामंत्री सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष माणिक माळी, काजल मछले, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सरिता चौधरी, महिला मोर्चा शहराध्यक्ष रोशनी राजपूत, नगरसेविका संगीता सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रेम पाटील, दिव्या जोशी, वैशाली राठोड, प्राची सोनवणे, सरिता चौधरी, आशाबाई पाडवी, ताई वळवी, उषाबाई वळवी, निनाबाई वळवी आदी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here