“कडाक्याच्या थंडीत स्तनदा माता व रुग्णांना पौष्टिक सुका मेवा खाद्य पाकिटे बेडवर मिळाल्याने समाधान”
Nandurbar News – तळोदा राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील सेवाभावी सामाजिक संस्था सहयोग सोशल ग्रुप तर्फे तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयातील स्तनदा माता रुग्ण यांना सध्या पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीत काजू, बदाम, किसमिस, खारीक, खोबरा, गुळ तसेच सर्व रुग्ण व त्याचा नातेवाईक यांना फळ सफरचंद, मौसंबी,संत्री व केळा व पौष्टिक खाद्याण्याचे व फळाचे पाकिटे वाटप करण्यात आले. सुका मेवा व खाद्य पदार्थ मुळे स्तनदा मातांना शारीरिक बल मिळेल व त्याचे स्वास्थ चागले राहील ,हलाखीच्या परिस्थितीमुळे गरीब कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ची एपत नसल्याने या थंडीत ते या पौष्टिक आहार त्यांच्या नशिबी नसते म्हणून सहयोग सोशल ग्रुप च्या वतीने या पौष्टिक खाद्यपदार्थाच्या वाटप करण्यात आले.
(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर कैलास ठाकरे सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष एडवोकेट अल्पेश जैन ,डॉक्टर भीमसिंग गिरासे , जेष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी,कुशल जैन ,चेतन शर्मा,ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रमेश मगरे ,जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी, प्रवासी महासंघ राजाराम राणे, पंडित भामरे, ज्येष्ठ पत्रकार रमेश कुमार भाट, विनोद माळी, वाय.के वसावे, अमिता गावित, अनिल वळवी, कृष्णा वाघमारे यांच्या हस्ते रुग्णालयातील माता व रुग्णांना पौष्टिक खाद्यण्याचे पाकटे वाटप करण्यात आले. सहयोग सोशल ग्रुप या आदर्श उपक्रमाने उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी स्तनदा माता रुग्णत्यांचे नातलग भारावले त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
- Nandurbar News : नंदुरबार शहरात पोलिसांची दारू प्रकरणी यशस्वी कारवाई…!
- Nandurbar News : महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टे विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा..!
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहयोग सोशल ग्रुप अध्यक्ष ऍड अल्पेश जैन ,कुशल जैन, चेतन शर्मा, डॉ भिमसिंग गिरासे,विनोद माळी ,नितीन पाटील ,काळूसिंग पाडवी,अक्षय धानका ,नामदेव पाडवी, दीपक पाडवी, मयूर पाडवी ,चेतन धानका ,किसन भरवाड,हरेश भरवाड,तुषार पाडवी,गणेश पाटील, मोईन पिंजारी, प्रमोद जांगिड ,यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
महेंद्र सूर्यवंशी तळोदा