Nandurbar News : सैन्यात अधिकारी होण्यासाठी मोफत पूर्व प्रशिक्षण..!

0
214
Nandurbar News Free pre-training to become an officer in army

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील सैन्य अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. नीलेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात ८ ते १७ जानेवारी २०२४ या कालावधीत सैन्य अधिकारी होण्यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या प्रशिक्षणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक, पात्र उमेदवारांची निवड मुलाखतींद्वारे केली जाणार आहे. मुलाखती २ जानेवारी २०२४ रोजी सकाळी अकराला धुळे येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात होणार आहेत.

(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुलाखतीस येताना उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, एनसीसी प्रमाणपत्र किंवा ‘सी’ ग्रेडमध्ये उत्तीर्णता प्रमाणपत्र, टेक्निकल ग्रॅज्युएटकोर्स साठी ‘एसएसबी’ मुलाखतीसाठीचे कॉल लेटर किंवा युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीमसाठी ‘एसएसबी’ कॉल लेटर यांची मुळ प्रतींसह हजेरी लावावी.

प्रशिक्षणासाठी निवड होणाऱ्या प्रशिक्षणार्थींसाठी कुठल्याही प्रकारचे निवास, भोजन व प्रशिक्षण शुल्क आकारले जाणार नाही.

या प्रशिक्षणामुळे उमेदवारांना सैन्य अधिकारी होण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक तयारी, शारीरिक तंदुरुस्ती, नेतृत्व कौशल्ये, सामूहिक कामगिरी, वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादी कौशल्ये विकसित होण्यास मदत होईल.

या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक training.petenashik@gmail.com इ-मेल वर अथवा ०२५३ – २४५१०३२ किंवा व्हाट्सॲप क्रमांकावर ९१५६०७३३०६ यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आवश्‍यक पात्रता

– उमेदवार कम्बाईड डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी परीक्षा उर्त्तीण असावा.

– एनसीसी प्रमाणपत्र किंवा ‘सी’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण असावे.

– टेक्निकल ग्रॅज्युएटकोर्स साठी ‘एसएसबी’ मुलाखतीसाठीचे कॉल लेटर असावे.

– युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीमसाठी ‘एसएसबी’ कॉल लेटर असावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here