Nandurbar News : 1 जानेवारीपासुन स्वस्त धान्य दुकान बेमुदत बंद..!

0
128
nandurbar-news-from-january-1-cheap-grain-shops-are-closed-indefinitely

Nandurbar News – धुळे जिल्हा स्वस्त धान्य दुकान व केरोसीन परवानाधारक संघटना शिंदखेडा तालुका वतीने तहसिलदार यांना

महाराष्ट्र राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या अडचणी, मागणी समस्या यावर आपल्याकडून कोणतीही सकारात्मक भूमिका न सोडवल्यामुळे महासंघाच्या वतीने आयोजित जाहीर आंदोलनाबाबत तसेच महासंघाच्या आदेशानुसार 1 जानेवारी पासून शिंदखेडा तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य वाटप दुकान बेमुदत बंद राहणार असल्याचे निवेदन तहसिलदार यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले.सदरील निवेदनाद्वारे,

 आमच्या महासंघाकडून आपल्या मागणी, अडचणी, समस्या यावर वारंवार अनेक निवेदने, प्रत्यक्ष भेटून, आपल्या कार्यालयात देऊन आजपावेतो आपल्या कार्यालयाकडून आमच्या महासंघाच्या एकाही पत्राला उत्तर किंवा त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.’

nandurbar-news-from-january-1-cheap-grain-shops-are-closed-indefinitely

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत स्वस्त धान्य दुकानदार हा महत्वपूर्ण घटक असून राज्य शासनाच्या विविध योजना, त्याची अंमलबजावणी करणारे आम्ही घटक आहोत. राज्यात, देशात अन्न सुरक्षा कायदयांतर्गत मोफत धान्य विवरण योजना सुरु झाल्यापासुन राज्यातील परवानाधारक त्रस्त झालेले असुन, त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. याबाबत सविस्तर निवेदने आपल्या कार्यालयात, सन्माननीय विधानसभा सदस्यांनी आपल्यापुढे आमची बाजु नोंदलेली असुन सुध्दा आपल्याकडुन काणत्याही प्रतिवाद मिळाला नाही. ही खेदाची बाब आहे.

nandurbar-news-from-january-1-cheap-grain-shops-are-closed-indefinitely

आमच्या मागण्या :- १) दरमहा ५० हजार रु मानधन मिळावे २) ई. पॉश मशीनला ५ जी प्रणाली देण्यात यावी. ३) प्रती किंटल धान्यामागे २ किलो घट ग्राहय धरण्यात यावी. ४) कमिशन प्रती किन्टल ४५० रु देण्यात यावे व ते येणा-या महिन्याच्या ५ तारखे पर्यंत मिळावे. वरील कोणत्याही मागणीचा विचार झालेला नाही व दखल घेण्यात आली नाही म्हणुन महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार, व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने व ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप फेडेशनच्या वतीने राज्य देश पातळीवर संघटनेने आंदोलनाचा घेतला असून या आंदोलनाचा पहिला टप्पा दि. १ डिसेंबर २०२३ रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यभरातील स्वस्थ धान्य दुकानदार यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधावे म्हणून तसेच मिडिया व  लोकप्रतिनिधींना तसेच जनतेला आपल्या प्रश्नांची जाण व्हावी म्हणुन व सरकारने तात्काळ दखल घ्यावी, यासाठी आंदोलन करण्यात आले तसेच नागपुर येथील हिवाळी अधिवेशनाच्या १२ डिसेंबर २०२३ च्या काळात राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदार नांगपूर येथे आंदोलनात्मक प्रवित्रा घेवुन मंत्री महोदय यांना निवेदन दिली होती त्यातही दखल घेण्यात आली नाही.

म्हणुन ऑल इंडिया फेअर प्राईम शॉप डिलर फेडरेशनच्या वतीने राज्यभरातील व देशभरातील स्वस्त धान्य दुकानदार दि. १ जानेवारी २०२४ पासुन आपली स्वस्त धान्य दुकाने आपल्या न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य व केंद्रीय संघटनेने घेतलेला असून राज्यभरातील रेशनकार्डधारक धान्यपासुन वंचित राहिल्यास यांची सर्वस्वी जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची राहील. असे म्हटले आहे. हयावेळी धुळे जिल्हा रेशन संघटना जिल्हा उपाध्यक्ष भाईदास पाटील, राजेंद्रसिंह राजपूत , सचिव सुधाकर पाटील, कार्यकारिणी सदस्य न्हानभाऊ पाटोळे, विजय पाटील , शिंदखेडा तालुका रेशन संघटना मार्गदर्शक डी.एस.पाटील, तालुकाध्यक्ष आर.आर.पाटील, उपाध्यक्ष तुषार पाटील, सचिव सुरेश कुंभार या पदाधिकारी सह तालुक्यातील रेशन दुकानदार व केरोसीन परवानाधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here