Nandurbar News – डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त, कृषी विभागाने कृषि संजीवनी पंधरवाडा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून, मौजे बंधारा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार श्री. चेतन कुमार ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी, शहादा श्री.तानाजी खर्डे, आणि तालुका कृषी अधिकारी, तळोदा श्रीमती. मिनाक्षी वळवी उपस्थित होते.(Nandurbar News)
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
कार्यक्रमात काय घडलं?
- श्रीमती. मिनाक्षी वळवी यांनी कृषी विभागाच्या ठिबक सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि प्रधानमंत्री पिक विमा योजना याबद्दल मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.
- मंडळ कृषी अधिकारी तळोदा श्रीमती. रजनी कोकणी यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड योजना आणि हवामान अनुकूल शेती पध्दती याबद्दल माहिती दिली. तसेच, गावातील प्रमुख पिके कापूस आणि ज्वारी यांच्यासाठी जमीन तयार करणे, वाण निवड, बीजप्रक्रिया, दोन ओळीतील आणि दोन रोपातील अंतर, खत व्यवस्थापन या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
- कृषी पर्यवेक्षक श्री. भरत माळी यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची दक्षता याबद्दल माहिती दिली. तसेच, बीजप्रक्रिया आणि सोयाबीन पिकासाठी घरचे बियाणे वापरताना बियाणाची उगवण क्षमता चाचणी याबद्दल मार्गदर्शन केले आणि बीजप्रक्रिया आणि उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक देखील करून दाखवले.
- कृषी सहाय्यक शिलदार पावरा यांनी माती नमुने काढणे आणि जमीन आरोग्य पत्रिका याबद्दल माहिती दिली आणि शिफारसीनुसार खत व्यवस्थापन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
- कार्यक्रमात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली आणि त्यांच्या शंका आणि समस्यांचे निराकरण करण्यात आले. (Nandurbar News)
या कार्यक्रमात मधुकर ठाकरे, सुरूपसिंग ठाकरे, होरुसिंग ठाकरे यासारख्या प्रगतशील शेतकरी आणि परिसरातील इतर शेतकरी उपस्थित होते.
कृषि संजीवनी पंधरवाड्याद्वारे शेतकऱ्यांना अनेक योजना आणि तंत्रज्ञानाबद्दल माहिती देऊन त्यांच्या शेतीला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे.