Nandurbar News : जंगलतोड रोखणाऱ्या वनरक्षकावर लाकूडतोड्यांचा हल्ला; नंदुरबारमधील घटना

0
153
nandurbar-news-lumberjacks-attack-forest-guards

Nandurbar News – नंदुरबार जिल्ह्यातील आष्टे वनक्षेत्रात लाकूडतोड रोखणाऱ्या वनरक्षकावर लाकूडतोड्यांचा हल्ला झाला. वनरक्षकांनी त्यांना लाकूडतोड करण्यास मनाई केली असता, संतापलेल्या लाकूडतोड्यांनी वनरक्षकावर हल्ला चढवला. या हल्ल्यात वनरक्षकाचे हाताला चावा लागून गंभीर दुखापत झाली.

नंदुरबार तालुक्यातील आष्टे वनक्षेत्रात पेट्रोलिंग करणाऱ्या वनरक्षक संजय वसंत देशमुख यांना 22 डिसेंबर रोजी सकाळी दोन जण लाकूडतोड करत असल्याचे दिसले. वनरक्षकांनी त्यांना लाकूडतोड करण्यास मनाई केली. याचा राग आलेल्या दोघांनी वनरक्षक देशमुख यांच्यावर हल्ला चढवला. यात एकाने वनरक्षक देशमुख यांचे हात पकडले तर दुसऱ्याने त्यांच्या बोटांना चावा घेत दुखापत केली. घटनेनंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले.

(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, वनरक्षक देशमुख यांनी ही बाब वरिष्ठांना कळवली. वनपथकाने दोघांचा शोध घेतला असता, दोघेही पिता-पुत्र असल्याचे समोर आले. दोघेही अजेपूर (ता. नंदुरबार) येथील रहिवासी आहेत. दीपक मांगीलाल भोये (55) व प्रफुल्ल दीपक भोये (22) अशी दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी वनरक्षक संजय देशमुख यांनी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित दीपक भोये (55) आणि प्रफुल्ल भोये (22) या दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here