Nandurbar News : नंदुरबारमध्ये प्रथम हिंदुराष्ट्र संस्थापक महाराजा खेतसिंहजी खंगार यांची जयंती साजरी

0
160
nandurbar-news-maharaja-khetsinhji-khangar-celebrated-his-birth-anniversary

Nandurbar News – नंदुरबार शहरातील बाहेरपुरा हाट दरवाजा परिसरात आज गढ कुंढार नरेश प्रथम हिंदुराष्ट्र संस्थापक झुजौतिखन्ड (बुंदेलखंड) भूतकालीन शासक विर शिरोमणी महाराजा खेतसिंहजी खंगार यांची ८८३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख रामभैय्या रघुवंशी, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेशभाऊ माळी, किरण (गोलूभैया) रघुवंशी, यशवर्धन रघुवंशी, विजय सामुद्रे, विश्व हिंदू परिषदेचे अजय कासार, करणीसेनेचे मुकेश राजपूत, गुलाबसिंग परमार, हिंदुजनजागृती समितीचे राहुल मराठे, जितेंद्र मराठे, रणरागिणी शाखेची कु. भावना कदम, श्री पप्पू गिरासे, अनिल परदेशी, श्री भूपेंद्रसिंग खंगार, शिवराणा प्रतिष्ठान चे अर्जुन राणा, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे हितेश भोई आदी मान्यवर आणि हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

image 12
nandurbar news
image 14
image 18

कार्यक्रमाची सुरुवात खंगार कुलदेवी गजानन मातेच्या पूजन-आरतीने करण्यात आली. मान्यवर आणि समाजातर्फे राष्ट्र पुरुष महाराजा खेतसिंह यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. तदनंतर अन्नदान वाटप करण्यात आले.

image 15
image 17

वीर योद्धा महाराजा श्री खेतसिंह यांचे जीवन वर्णन आणि त्यांनी भूतकाळात हिंदू संस्कृती आणि देशासाठी केलेले समर्पण याची माहिती क्षत्रिय खंगार समाज प्रदेश उपाध्यक्ष सुमित परदेशी यांनी दिली.

image 16

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र खंगार यांनी तर आभार प्रदर्शन चि हर्षल खंगार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व हिंदूप्रेमींनी परिश्रम घेतले.

ब्युरो रिपोर्ट, एम.डी.टीव्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here