Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!

0
43
Nandurbar News National Renewable Energy Day program celebrated at JG Natavadkar Junior College

भारत सरकारने 20 ऑगस्ट हा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सन 2004 सालापासून राष्ट्रीय अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे.

अक्षय ऊर्जा म्हणजेच ज्या ऊर्जेचा कधीही क्षय होत नाही अशी ऊर्जा. आजघडीला आपल्या देशाचा सर्वाधिक खर्च हा इंधन आयातीवर होतो, आणि ते देखील जीवाश्म इंधन असते ज्यामुळे प्रदूषण वाढीस हातभार लागतो. ग्रीन हाऊस गॅस,‌ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ हे आज परवलीचे शब्द झाले आहेत इतकी या संकटांची तीव्रता वाढलेली दिसून येते आणि या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजेच अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, भरती-ओहोटी पासून निर्मित ऊर्जा, भू-औष्णिक ऊर्जा अशी अक्षय ऊर्जेची अनेक उदाहरणे सांगता येतील.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशाला सौर ऊर्जेचे वरदान लाभले आहे. येथे वर्षातील जास्तीत जास्त दिवस सौर ऊर्जा मिळवता येऊ शकते सरकारी पातळीवर सुद्धा त्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत जेणेकरून प्रत्येक घटकापर्यंत अक्षय ऊर्जेचा लाभ पोहोचवला जावा आणि सोबतच पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि देशाचे इंधनावरील अवलंबित्व कमी व्हावे. भारतासारख्या कृषी प्रधान देशांमध्ये बायोगॅस निर्मितीला सुद्धा बराच मोठा वाव आहे, या माध्यमातून देखील आपण पर्यावरण स्नेही ऊर्जा साधने वापरू शकतो.

संयुक्त राष्ट्र संघटनांनी निर्धारित केलेल्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये देखील अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे ही काळाची गरज व्यक्त केली, असून कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून अनेक देशांना अक्षय ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. आपल्या वसुंधरेचे, पर्यावरणाचे आणि मानवासोबतच समस्त जीवांचे रक्षण व्हावे आणि पुढच्या पिढीच्या हातात सुरक्षित भविष्य देता यावे यासाठी अक्षय ऊर्जेचा वापर आज काळाची गरज बनलेला आहे.

भारत सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून आज प्रत्येक नागरिकाला अक्षय ऊर्जेकडे वळणे सुलभ आणि किफायतशीर ठरू लागले आहे. असे प्रतिपादन प्रमुख वक्ते प्रा.श्री.चंद्रकांत देसले यांनी केले

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.सुहासिनी नटावदकर उपस्थित होत्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. एस.के.चौधरी

पर्यवेक्षक एस.एफ.सोनार उपस्थित होते.

तसेच डॉ.गिरीश पवार, प्रा. पुष्पराज पारधी, प्रा. कन्हैयालाल बोरसे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.अरुप गोस्वामी यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. रणजीत सूर्यवंशी यांनी केले.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here