Nandurbar News : काकर्दे येथे वृक्षाधार उपक्रमातून वृक्षारोपण…!

0
114
nandurbar-news-plantation-of-trees-initiative-at-kakarde

Nandurbar News – तालुक्यातील काकर्दे गावात वृक्षाधार कार्यक्रम घेण्यात आला. गावातून वृक्षदिंडी काढून वृक्ष लागवडीसह संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच ग्रामस्थांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे.

नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथे सामाजिक वनीकरण विभाग नंदुरबार, एचडीएफसी बँक लि.नंदुरबार, लोककल्याण बहुउद्देशीय संस्था नंदुरबार आणि काकर्दे ग्रामपंचायत यांच्या विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त वृक्षाधार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक वनीकरण विभाग नाशिकचे वनसंरक्षक गजेंद्र हिरे, सामाजिक वनीकरण विभाग नंदुरबारचे विभागीय वनअधिकारी डॉ.म.प्र.गुजर यांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आले.

Nandurbar News Plantation of trees from Vrikshaadhar initiative at Kakarde

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

कार्यक्रमास सहाय्यक गट विकास अधिकारी श्री.संदीप वायाळ साहेब,एचडीएफसी बँक नंदुरबारचे शाखाधिकारी राम पवार, काकर्देच्या सरपंच सौ.रेखाबाई राकेश माळी, एचडीएफसी बँक धुळेचे क्लस्टर हेड प्रविण जाधव, काकर्देचे ग्रामसेवक शरद गायकवाड, नंदुरबारचे वनक्षेत्रपाल आर.जे.लामगे, बँकेचे नंदुरबार युनिट हेड पंकज महाले, लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पंकज ठाकरे, सचिव राकेश चौधरी, सदस्य किशोर महाले, संदिप चौधरी, निखील चौधरी, बँक कर्मचारी शितल बडगुजर, जितेंद्र पाटील, भावना चौधरी, मृणाली पानपाटील, विनोद गिरासे व डीएससी संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. वृक्षाधार कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. या वृक्षदिंडीत संत सावंता भजनी मंडळ व ग्रामस्थ सहभागी झाले. तसेच वृक्ष लागवडीसाठी मोकळ्या जागेत वृक्षाधार फलकाचे अनावरणही करण्यात आले.सावता भजनी मंडळ यांनी सहकार्य केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजकांनी परिश्रम घेतले.

Plantation of trees from Vrikshaadhar initiative at Kakarde Nandurbar News

प्रतिनिधी – योगेश पाटील नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here