Nandurbar News… नंदुरबार लोकसभा मतदार संघातील ७७७ गावांसाठी १५५ कोटींचा निधी मंजूर

0
207

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.हीना गावीत व आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांच्या प्रयत्नाने प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजनेअंतर्गत १५५ कोटी २५ लाख ६७ हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीतून नंदुरबार, तळोदा व धुळे प्रकल्पांतर्गत असलेल्या ७७७ गावांमध्ये विविध विकास कामे करण्यात येणार आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

BREAKING NEWS… १८ आमदार परत येणार ; संजय राऊतांचा खळबळजनक दावा ! | MDTV NEWS

GOOD NEWS…शिंदखेड्याच्या “त्या” तरुणाला मुख्यमंत्रांकडून शाब्बासकी… ५ लाखाचे बक्षीस देऊन केला गौरव ! | MDTV NEWS

Nandurbar… समान नागरी कायदा : आदिवासी संघटना आक्रमक ,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन | MDTV NEWS

नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.हीना गावीत व आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांच्या प्रयत्नाने नंदुरबार लोकसभा मतदार संघातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी व नवापूर तालुक्यातील गावांना प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना सन २०२१-२२ व २०२२- २३ या आर्थिक ग्राम विकास आराखड्यांच्या निधीस मंजुरी देण्यात आली.

हे सुध्दा वाचा

BREAKING NEWS… १८ आमदार परत येणार ; संजय राऊतांचा खळबळजनक दावा ! | MDTV NEWS

GOOD NEWS…शिंदखेड्याच्या “त्या” तरुणाला मुख्यमंत्रांकडून शाब्बासकी… ५ लाखाचे बक्षीस देऊन केला गौरव ! | MDTV NEWS

Nandurbar… समान नागरी कायदा : आदिवासी संघटना आक्रमक ,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन | MDTV NEWS

या निधीव्दारे या गावांमध्ये गाव अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक, बंदिस्त गटार, बसस्टँड, अंगणवाड्या, महिला व पुरुष शौचालय, सार्वजनिक मुतारी, पाण्याची टाकी बांधणे व नळ जोडणी करणे, जिल्हा परिषद वर्गखोल्या, ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह रस्ते व पुलांचे बांधकाम, स्मशानभुमी बांधकाम, आरोग्य उपकेंद्र बांधकाम, संरक्षण भिंत, ग्रंथालय, व्यायामशाळा, आर.ओ. वॉटर फिल्टर, सोलर ड्युअल पंप, सोलर लाईट, हँडपंप, अशा विविध विकासकामांना चालना मिळणार आहे.

हे सुध्दा वाचा

BREAKING NEWS… १८ आमदार परत येणार ; संजय राऊतांचा खळबळजनक दावा ! | MDTV NEWS

GOOD NEWS…शिंदखेड्याच्या “त्या” तरुणाला मुख्यमंत्रांकडून शाब्बासकी… ५ लाखाचे बक्षीस देऊन केला गौरव ! | MDTV NEWS

Nandurbar… समान नागरी कायदा : आदिवासी संघटना आक्रमक ,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन | MDTV NEWS

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सदर योजने अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील ८९ गावे, शहादा तालुक्यातील १११ गावे, नवापूर तालुक्यातील १४५ गावे, तळोदा तालुक्यातील ७२ गावे, अक्कलकुवा तालुक्यतील १४२ गावे, अक्राणी तालुक्यातील ११९ गावे अशी एकुण ६७८ गावे व धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील ६० गावे साक्री तालुक्यातील ३९ गावे अशा एकुण ७७७ गावांना सदर योजनेमधुन नंदुरबार, तळोदा व धुळे प्रकल्पांतर्गत १५५ कोटी २५ लाख ६७ हजार रुपये एवढा निधी मंजुर करण्यात आला आहे.
एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here