Nandurbar News : हॉटेलला भीषण आग, 4 ते 5 लाखांचे नुकसान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता

0
139
nandurbar-news-severe-fire-at-hotel-loss-of-4-to-5-lakhs

Nandurbar News : नंदुरबार: हॉटेलला लागलेल्या आगीत ५ लाखांचे नुकसान; पोलीस तपासाला सुरूवात.नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील मिशन शाळेच्या प्रवेशद्वारावरील एका हॉटेलला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत हॉटेलमधील साहित्य जाळून खाक झाल्याने हॉटेल चालकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हॉटेल मालक यांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या सुमारास सर्व काम आटोपून हॉटेल बंद करून घरी गेले होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलला अचानक आग लागली. या आगीत हॉटेलमधील पाच ते सहा फ्रिज, खाण्याचे साहित्य, टेबल खुर्च्या यांच्यासह स्वयंपाक तयार करण्याचे भांडी आदी साहित्य आगीत जळून खाक झाले.

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत हॉटेलचालकाचे मोठे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, एम.डी.टीव्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here