Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड

0
273

नंदुरबार जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून फरार होणाऱ्या टोळीला नंदुरबार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ७ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक ११ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास रजनी सुधीर पाटील (वय – ५६ धंदा-किराणा दुकान रा.जनता पार्क,लिंक रोड, नवापूर) यांचे दुकानात दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या दुकानात खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवून दोन अज्ञात इसमांपैकी एका इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत ही जबरीने ओढून नेली होती. याबाबत नवापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सदर घटनेचे माहिती पोलिसांना मिळताच नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदार्नखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर,नवापूर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे तसेच स्थानिक गुन्हा शाखा व नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. जिल्ह्यातील सर्व ठिकाणी व नवापूर पोलीस ठाण्याला लागून असलेल्या गुजरात राज्यातील पोलीस ठाण्यांना देखील नाकाबंदी लावण्यात आली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

स्थानिक गुन्हे शाखेचे व नवापूर पोलीस ठाण्याचे पथके नवापूर ते विसरवाडी पोलीस ठाणे व नवापूर ते सोनगड या रोडवर गस्त तसेच नाकाबंदी करीत असताना नवापूर येथे संशयित वाहन सोनगड ते महाराष्ट्र राज्याकडे भरधाव वेगाने येताना दिसले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहन चालकाने वाहन न थांबविता नाकाबंदी चुकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संशय आल्याने सदर वाहनाचा पाठलाग करून वाहनास काही अंतरावर थांबविले वाहनातील इसमांना खाली उतरवून त्यांचे नाव गाव विचारले असता अब्बास इबाबत शेख (रा. पापा नगर भुसावळ), सादिक इबाबात शेख (रा, पापानगर,भुसावळ) सखी मोहम्मद खान रा. मुस्लिम कॉलनी,भुसावळ), एक अल्पवयीन मुलगा तसेच वाहन चालक अनिल शामराव सोनवणे रा.यावल) असे सांगितले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे वर्णन दिनांक ११ जुलै रोजी नवापूर शहरातील जनता पार्क येथे झालेल्या सोनसाखळी चोरीतील चोरट्यांशी मिळतेजुळते वाटल्याने त्यांना ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली. त्यांनी दि. ११ रोजी नवापूर शहरात जनता पार्क येथे त्यांच्या एक साथीदाराच्या मदतीने मोटरसायकल वाहनावर आप्पासाहेब व एक अल्पवयीन मुलाने मिळून एका दुकानातील महिलेच्या गळ्यातील चैन तोडून पळून गेल्याचे सांगितले. तसेच त्यांना इतर ठिकाणी कुठे या प्रकारचे गुन्हे केले आहे काय? याबाबत विचारपूस केली असता त्यांनी ११ जुलै रोजीच गुजरात राज्यातील व्यारा शहरात व अब्बास ईबाबत शेख व त्यांच्या फरार साथीदाराच्या मदतीने महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चैन तोडून पळून गेलेबाबत माहिती दिली.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून १ लाख ५७ हजार ५०० रुपये किमतीचे १३५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चैन, ३२ हजार ५०० रुपयांचे पाच मोबाईल व ५ लाख रुपये किमतीचे एक चार चाकी वाहन असा एकूण ७ लाख रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सदरचे कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उपविभागी पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे,स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, जितेंद्र तांबोळी,पोलीस नाईक राकेश मोरे, मोहन ढमढेरे, जितेंद्र तोरणे, हेमंत सैंदाणे, पोलीस अंमलदार अभय राजपूत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे.

नितीन गरुड. एमडीटीव्ही न्युज तळोदा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here