Nandurbar News – नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील तळोदा (Taloda )शहरातील शिक्षक सुनील मगरे यांनी त्यांच्या घरी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास वेळेत होण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक (Nashik)यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात मगरे यांनी म्हटले आहे की, त्यांच्या गोपाळ नगर येथील राहते घरी दिनांक २२ जून २०२३ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेच्या दरम्यान किचन रुमच्या खिडकीच्या ग्रील तोडून अज्ञात चोरटयांनी प्रवेश करून बेडरुममधील कपाटातील मुलीच्या लग्नासाठी जमवून ठेवलेले सोन्या चांदीचे दाग-दागिने, अश्या सुमारे साडेतीन ते चार लाख (३.५० ते ४ लाख) रुपयांचा मुद्येमाल व मौल्यवान वस्तूंची चोरी केली आहे. याबाबत तळोदा पोलीस स्टेशन येथे गु.र.न. ०२१२/२०२३ कलम ४५४, ३८० प्रमाणे दि. २२ जून २०२३ रोजी गुन्हा नोंद केलेला आहे.
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
मगरे यांनी म्हटले आहे की, गुन्हा घडल्यापासून ते आजपावेतो गुन्हयाचा तपास संथगतीने केला जात असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारे तपासात प्रगती झालेली दिसत नाही. त्यांनी वेळोवेळी विचारपुस केल्यावर तपास चालू आहे, तपास लागल्यावर कळविण्यात येईल, असे सांगितले जाते.
- Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
- Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
मगरे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना विनंती केली आहे की, सदरच्या गुन्हयाचा तपास हा त्यांच्या स्तरावरुन करण्यात यावा, तसेच सदर गुन्हयाचा लवकरात लवकर छडा लावून आमच्या सारख्या सर्वसामान्यांना योग्य तो न्याय मिळवुन द्यावा.
या निवेदनावरून असे दिसून येते की, तळोदा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास वेळेत होत नसल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करून गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी होत आहे.
याचिकाकर्ता :- श्री. सुनील पुंडलिक मगरे (माध्यमिक शिक्षक) रु. तळोदा, गोपाळ नगर, शहादा रोड, तळोदा ता. तळोदा जि. नंदुरबा
✍महेंद्र सूर्यवंशी तळोदा