Nandurbar News Today : शासकीय मुलींचे आश्रम शाळा कोठली ता.नंदुरबार येथे विदयार्थीनी आत्महत्या केल्याचे दुर्दैवी घटना घडली.परंतु,आत्महत्या की घातपात झाला.याची चौकशी व्हावी यासाठी बिरसा फायटर्सने पोलीस अधीक्षक नंदुरबार,अध्यक्ष अनुसूचित जाती -जमाती आयोग,अध्यक्षा महिला आयोग,मुख्यमंत्री,राज्यपाल,प्रकल्प अधिकारी यांना निवेदन पाठवले आहे.
निवेदन म्हटले आहे की,१४ जानेवारी २०२४ रोजी रात्री शासकीय मुलींचे आश्रम शाळा कोठली ता.जि.नंदुरबार येथे इयत्ता ८ वीत शिकणाऱ्या सोनिया वाड्या नाईक या विदयार्थीनीची आत्महत्या की घातपात झाला.आश्रम शाळेत एका खोलीत अनेक मुली एकत्रित राहत असतांना वरच्या मजल्यावरील खोलीत खिडकीला दोरीने बांधून,आत्महत्या केल्याचे संबंधित शालेय प्रशासनाकडून सांगण्यात आले.चार दिवसापूर्वी आई मुलींला भेटून गेल्या.मुलगी आनंदित होती.शालेय प्रशासनाने मुलीची तब्येत बिघडल्याचे घरी फोन करून माहिती दिली.आणि त्यांनंतर थोड्यावेळानंतर घडफास घेतल्याची माहिती मिळाली.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
मुलगी चांगली असतांना असे अचानक काय घडले.असे मुलींच्या नातेवाईकांनी केले.घडलेली घटना संशयास्पद वाटते.मुलींला न्याय मिळावा.आठवीत शिकणारी मुलगी आत्महत्या का करेल?आत्महत्या की घातपात?याला जबाबदार कोण?सत्यता बाहेर येऊन न्याय मिळावा;यासाठी पारदर्शकपणे चौकशी करावी.तसेच,काही महिन्यापूर्वी संबंधित प्रशासनाचा दुर्लक्षतेमुळे शासकीय आश्रम शाळा तोरणमाळ ता.धडगांव व शासकीय आश्रम शाळा कुंभारखान ता.अक्कलकुवा येथील विदयार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाले.गेल्या काही वर्षात तब्ब्ल २८२ आदिवासी आश्रम शाळेतील विदयार्थ्यांच्या मृत्यूची नोंद आहे.ही अतिशय दुःखद बाब आहे. घटनेची सखोल चौकशी करून,दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,तळोदा सहसचिव सतीश पाडवी,विकी पाडवी,राकेश वळवी,किसन वळवी यांच्या सह्या आहेत.
- Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
- Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
गोपाल पावरा धडगांव प्रतिनिधी