Nandurbar News Today : कोंडाईबारी घाटात भीषण अपघात..! कंटेनर आणि ट्रकची धडक…

0
169
Nandurbar News Today Terrible accident Collision between container and truck...

Nandurbar News Today – आज सकाळी कोंडाईबारी घाटात एका भीषण अपघातात एका कंटेनर आणि ट्रकची धडक झाली. या अपघातात कंटेनर चालक जागीच ठार झाला, तर ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी ट्रक चालकाला तात्काळ नवापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती

प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी 7 च्या सुमारास कोंडाईबारी घाटातून जाणाऱ्या एका कंटेनर आणि ट्रकची धडक झाली. या धडकेत कंटेनर चालक जागीच ठार झाला. तर ट्रक चालक आणि त्याचा वाहक हे दोघेही ट्रकखाली अडकून गंभीर जखमी झाले.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

स्थानिकांनी केली मदत

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि ट्राफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी ट्रक चालक आणि वाहक यांना क्रेन च्या मदतीने तातडीने ट्रकखालून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना त्वरित नवापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Nandurbar News Today  Terrible accident Collision between container and truck...

ट्रॅफिक पोलिसांनी सुरू केली चौकशी

पण तो पर्यंत विसरवाडी पोलीस अद्याप ही उपस्थित नाही होते. ट्राफिक पोलीस च्या कर्मचारी यांनी कंटेनर व ट्रक क्रेन च्या साहाय्याने बाजूला करून ट्रॅफिक सुरळीत चालू करण्यात आली.या भयानक अपघाताची चौकशी कोंडाईबारी ट्रॅफिक पोलीसांनी सुरू केली आहे. कंटेनर चालक जागीच ठार झाल्यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर गंभीर जखमी असलेल्या ट्रक चालक आणि वाहकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.(Nandurbar News Today)

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Terrible accident Collision between container and truck Nandurbar News Today

अपघातामुळे वाहतूक कोंडी

या अपघातामुळे कोंडाईबारी घाटावर काही वेळ वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, ट्रॅफिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळावरून वाहतूक सुरळीत केली.या अपघातामुळे परिसरात हळहळ वातावरण निर्माण झाले आहे.(Nandurbar News Today)

पवन संदनशिव साक्री प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here