केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा नंदुरबारमध्ये दाखल झाली. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
Nandurbar News Today – केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा नंदुरबार येथील माळीवाडा परिसरात स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे दाखल झाली. या यात्रेचे परिसरातील नागरिकांनी भव्य स्वागत केले.

याप्रसंगी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजपा जिल्हाध्यक्ष श्री निलेशभाऊ माळी कार्यक्रमाचे आयोजक नगर परिषद मुख्याधिकारी श्री अमोलजी बागुल, माळी समाज अध्यक्ष श्री आनंद आण्णा माळी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री माणिक माळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री मोहन नाना माळी , रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष श्री मनोज गायकवाड सर, माजी नगरसेवक श्री जगनभाऊ माळी व श्री लक्ष्मणभाऊ माळी, शिवसेनेचे श्री विजयभाऊ माळी मुख्याध्यापक श्री निंबा माळी सर व मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.( Nandurbar News Today )

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
या कार्यक्रमात प्रशासनाद्वारे नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना आदी योजनांचा समावेश होता.( Nandurbar News Today )

- Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
- Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!

या कार्यक्रमात बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी म्हणाले की, केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे. या योजनांचा लाभ घेऊन नागरिक आपले जीवनमान उंचावू शकतात.