Nandurbar News : श्रीक्षेत्र वावद येथे आध्यत्मिक वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन..

0
173
Nandurbar News Spiritual Warkari Children's Sanskar Camp organized at Srikshetra Vavad..

उन्हाळीसुट्टीत इ 3री ते 12 वी पर्यंतच्या मुलांसाठि मोठी पर्वणी

Nandurbar News : सांप्रत अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वर्तमान काळात जीवन अस्थिर व अधिक तनावग्रस्त अडचनीचे दिसून येत आहे.मुलामध्ये व्यवसायिक शिक्षण समवेत नैतिक मूल्ये, सुसंस्कार मुल्यांचा अभाव दिसून येत आहे.व्यसनाधिनता, संताचे शिक्षण, धर्म, संस्कृति, परंपरा, आचार, विचार, आरोग्य, चारित्र्य, चरित्र, हे सर्व प्रश्न सध्याच्या काळात अनुत्तरित आहे या प्रश्नाचे उत्तर व उपयोजन हे संत वाड:मयात मध्ये समाविष्ट समग्र ज्ञानातुन मिळू शकते.

हिच काळाची गरज ओळखून नव्या उद्योन्मुख उमलत्या पिढीला व समाजाला हे ज्ञान देणे काळाची गरज आहे. म्हनून भविष्य कालीन मानवी जीवन उदात्त व व्यापक यशस्वी समृध्द उज्वल घडविन्यासाठी आध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन करणे  ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन भागवताचार्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज नंदूरबार कर यांनी केले, तरी येत्या उन्हाळी सुट्टीत इ 3 री ते 12 वी पर्यंतच्या मुलांसाठी.Nandurbar News

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दि.25 एप्रिल 2024 ते 15 में 2024 पर्यन्त अखिल विश्वानंद वारकरी मिशन या संस्थेअंतर्गत आध्यत्मिक वारकरी बालसंस्कार शिबिर व संगितमय भागवत कथा आयोजन करण्याचे ठरवले आहे. यावेळी समस्त ग्रामस्थ वावद यानी ह भ प ज्ञानेश्वर महाराज नंदूरबार कर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करुण या उपक्रमास अनुमोदन देण्यात आले. यावेळी सदर शिबिराला जास्तीत जास्त संख्येने मूल सहभागी करण्याचे आवाहन ही करण्यात आले. या शिबिरासाठी नंदूरबार,धुळे, जळगाव व नाशिक अश्या विभागीय स्तरातून विद्यार्थी सहभागी होणार असून वावद ग्रामस्थाकडे नाव नोंदणी सुरु झालेली आहे.

यावेळी गावाचे सरपंच सुदाम पाटिल, रविन्द्र पाटील, प्रवीण भाऊसाहेब पाटील, लक्ष्मण पाटील, सतीश पाटील, नारायण राजपूत, जितेंद्र राजपूत, विलास पाटील, जितेंद्र पवार,प्रवीण गवळी, धनंजय पाटील, प्रवीण लोणारी,तेजस राजपूत,भूषण पाटील, चंद्रसिंग राजपूत, प्रवीण पाटील, पंढरीनाथ पाटील आधी बाळगोपाल वृद्ध युवक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आगामी होणाऱ्या शिबिराला अनुमोदन देऊन सहकार्य देण्याचे आवाहन गावकऱ्याकड़ून  देण्यात आले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here