नंदुरबार शहरात पोलिसांनी दारू प्रकरणी यशस्वी कारवाई करून आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण विठ्ठल मोरे यांनी दाखल केलेल्या फिरादीनुसार, कारवाई पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाई पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ आणि डीबी पथकाचे अंमलदार पोलीस हवालदार नरेंद्र चौधरी, किरण मोरे, कल्पेश रामटेके, विशाल मराठे हे समाविष्ट होते.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
पोलिसांनी या कारवाईत एक मोटरसायकल जप्त केली असून, मोटरसायकल सह एकूण मुद्देमाल 18080 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.या प्रकरणी आरोपी म्हणून कल्पेश पांडुरंग पवार (वय ३७, राहणार शनिमांडळ) याला अटक करण्यात आली आहे.

एमडी टीव्ही साठी सागर पाटील नंदुरबार