नंदुरबारकरांकडे साडेसतरा कोटीची कर थकबाकी

0
1141

थकबाकीदारांनी तात्काळ कर भरणा करावा : मुख्याधिकारी पुलकीत सिंह यांचे आवाहन

नंदुरबार : एप्रिल महिना अखेर आला असतांनाही अद्यापही पालिकेचे अपेक्षित कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. कर भरणा करण्याचे आवाहन करुन देखील नागरिकांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. एप्रिल अखेरपर्यंत मालमत्ताधारकांनी कर भरणा केलेला नाही. यामुळे पालिकेकडून आता जप्तीची कारवाई सुरु करण्यात येणार आहे. गेल्या वर्षाचा तब्बल १७ कोटी ५० लाख रुपयांहून अधिकचा मालमत्ता कर व इतर कर थकबाकी आहे. पालिकेकडून होणारी जप्तीची कटू कारवाई टाळण्यासाठी कर भरणा करण्याचे आवाहन मुख्याधिकारी पुलकीत सिंह यांनी केले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

एप्रिल महिना अखेर आला असतांनाही अद्यापही पालिकेचे अपेक्षित कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. कर भरणा करण्याचे आवाहन करुन देखील नागरिकांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. अद्यापही १७ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये शासकीय मालमत्ता व इतर मालमत्ता, पाणीपट्टी, घरपट्टी आदी करांचा समावेश आहे. दरम्यान, नंदुरबार पालिकेच्यावतीने गेल्या वर्षभरात ६ कोटी १२ लाखांची कर वसुली झाली आहे.

वारंवार आवाहन करुन देखील कर भरणा होत नसल्याने आता कर वसुलीसाठी नंदुरबार पालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. अवघ्या सव्वा सहा कोटींची वसुली झाल्याने उर्वरित वसुलीसाठी पालिकेने जप्तीची कारवाई सुरु केली आहे. थकबाकीदार असणाऱ्या मालमत्ताधारकांना यापूर्वीच नोटीसा देण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही नगर परिषदेचा कर भरलेला नाही अशा मालमत्ता जप्तीची कारवाई सुरु करण्यात आली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यामुळे मालमत्ता कर व इतर कर थकबाकी असेल त्यांनी तात्काळ नगर परिषदेकडे भरणा करावा अन्यथा संबंधित मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. ज्या मालमत्ताधारकांनी थकबाकी असेल त्यांनी तात्काळ कर भरणा करावा, असे आवाहन मुख्याधिकारी पुलकीत सिंह यांनी केले आहेे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here