नंदुरबार पोलीसांची कारवाई ; दारूसह ४६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0
275

नंदुरबार :-१७/५/२३

धुळ्याकडून विसरवाडी, नवापूर मार्गे गुजरात येथे नेण्यात येणारी अवैध दारू नंदुरबार एलसीबी व नवापूर पोलिसांनी पकडली आहे.

या कारवाईत कंटेनरसह ४६ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

नंदुरबार पोलिसांच्या या कारवाईने अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.

नंदुरबार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यात दारुबंदी असल्यामुळे महाराष्ट्रातून अवैध दारुची चोरटी वाहतूक होत असते.

त्याविषयीच्या तक्रारी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने गुजरात राज्यात अवैधपणे दारुची वाहतूक होणार नाही तसेच अवैध दारुची तस्करी करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करणेबाबत श्री.पाटील यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना निर्देश
दिले होतेे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

दरम्यान, दिनांक १५ मे रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धुळ्याकडून विसरवाडी, नवापूरमार्गे महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात एका कंटेनरमधून अवैध दारुची चोरटी वाहतूक होणार आहे, त्यावरून पोलीस अधीक्षक श्री.पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना माहिती देवून नवापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे मिळून एक पथक तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन कारवाई करण्याबाबत आदेशीत केले.

मिळालेल्या बातमीच्या आधारे नवापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील सुरत ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी हॉटेलजवळ सापळा रचला. धुळेकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असतांना रात्री १० वाजेच्या सुमारास एक अशोक लेलैंड कंपनीचा तपकिरी रंगाचा कंटेनर भरधाव वेगाने येतांना दिसला, पोलीस पथकातील अमंलदारांनी त्यास थांबविण्याचा इशारा देवून वाहन थांबविले. वाहनातील इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता प्रकाश नरसिंगराम देवासी, ( वय-२६ रा. गंगाणी ता.बावडी जि.जोधपुर (राजस्थान) असे सांगितले.

पथकांनी त्यास वाहनात काय भरले आहे ? याबाबत विचारपूस केली असता, वाहनात मेडीको कंपनीचे औषधाचे खोके असून ते अहमदनगर येथून हिमा फार्मसीट्रीकल्स प्रा.लि.अंकलेश्वर येथे घेवून जात असल्याचे सांगून त्याबाबत बिलाची छायांकीत प्रत दाखविली.

वाहन चालकास विचारपूस करीत असतांना तो उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याचे समजून आल्याने पथकांनी वाहन ताब्यात घेवून तपासणी केली असता त्यात खाकी रंगाचे बॉक्स व त्यामध्ये विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या आढळून आल्या.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सदरचे चारचाकी वाहन विसरवाडी पोलीस ठाणे येथे आणून वाहनाची तपासणी केली असता त्यात २३ लाख ३२ हजार ८०० रुपये किमतीचे इम्पेरियल ब्लू ब्लेंडर ग्रेन विस्कीचे ६४८ खोके, त्यात १८० एमएल.च्या एकुण ३१ हजार १०४ नग काचेच्या बाटल्या, ३ लाख ८८ हजार ८० रुपये किमतीचे रॉयल चॅलेंज फिनेस्ट प्रीमियम विस्कीचे ९८ खोके, त्यात ७५० एमएल.च्या एकुण ११७६ नग काचेच्या बाटल्या, ३ लाख ७९ हजार ४४० रुपये किमतीचे रॉयल चॅलेंज फिनेस्ट प्रीमियम विस्कीचे ९३ खोके, त्यात १८० एमएल.च्या एकुण ४४६४ नग काचेच्या बाटल्या, ५ हजार रुपये किमतीचा एक ओप्पो कंपनीचा मोबाईल, झालानी मेडीकोचे ई-वे बील, १५ लाख रुपये किमतीचा कंटेनर (क्रमांक केए ५१ – बी ९९७४ ) असा एकुण ४६ लाख ५ हजार ३२० रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळून जप्त करुन प्रकाश नरसिंगराम देवासी यास अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई), १०८,सह भा.द.वि. कलम ४२०, ४६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस उपनिरीक्षक भुषण बैसाणेे, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक युवराज परदेशी, पोलीस हवालदार पंकज पाटील, दिनेश वसुले, राजेश येलवे, पोलीस नाईक किशोर वळवी, योगेश थोरात, अतुल पानपाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, राकेश वसावे, जितेंद्र तांबोळी, जितेंद्र ठाकुर, विशाल नागरे, दादाभाई मासुळ, जितेंद्र तोरवणे, राजेंद्र काटके, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here