Nandurbar Police… कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या १२८ गोवंशाची केली सुटका…!

0
307

नंदुरबार :- जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सवांच्या काळात किरकोळ कारणांवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन शांतता भंग करण्याच्या विचारात असणारे समाजकंटक व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अवैध जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक, खरेदी, विक्री होणार नाही, याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या होत्या.

हे सुध्दा वाचा

Edit Post “Nandurbar News… वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित” ‹ MDTV NEWS — WordPress

Good News…नंदुरबार जिल्ह्यातील मुस्लिम बांधवानी घेतला निर्णय…. ईदला बकरीची कुर्बानी नाही ! | MDTV NEWS

बापरे… पुण्यात पुन्हा एका मुलीवर जीवघेणा हल्ला…! | MDTV NEWS

Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर-पाटील यांचे आदेशान्वये दिनांक २६ जून २०२३ रोजी रात्री ११ ते ते दिनांक २७ जून २०२३ रोजीचे सकाळी ५ वाजे दरम्यान कोंबिंग, नाकाबंदी ऑपरेशन राबविणेबाबत आदेशीत करण्यात आले होते. कोंबिंग, नाकाबंदी ऑपरेशन दरम्यान इतर प्रकारच्या अवैध धंद्यांबरोबरच कत्तलीसाठी गोवंश जनावरांची वाहतूक होणार नाही याबाबत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना निर्देश दिले होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

दिनांक २६ जून रोजी रात्री नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नवापूर शहरातील ईस्लामपुरा भागात कत्तलीसाठी अवैधरीत्या जनावरांना बांधून ठेवलेले आहे. सदरची माहिती त्यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना सांगून पुढील कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.

हे सुध्दा वाचा

Edit Post “Nandurbar News… वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित” ‹ MDTV NEWS — WordPress

Good News…नंदुरबार जिल्ह्यातील मुस्लिम बांधवानी घेतला निर्णय…. ईदला बकरीची कुर्बानी नाही ! | MDTV NEWS

बापरे… पुण्यात पुन्हा एका मुलीवर जीवघेणा हल्ला…! | MDTV NEWS

Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS

त्याअनुषंगाने नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व त्यांच्या पथकाने नवापूर शहरातील इस्लामपुरा कसाईवाडा परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबविले असता वेगवेगळ्या ठिकाणी लहान बंदीस्त खोल्यांमध्ये ९ लाख ६७ हजार रुपये किमतीची १२८ गोवंश जनावरे बांधलेल्या अवस्थेत मिळून आले. मिळून आलेल्या सर्व जनावरांची पोलीस पथकाने सुटका करुन त्यांची तातडीने चारापाण्याची व्यवस्था केली. सुटका केलेल्या जनावरांना गोशाळेत दाखल करण्यात आलेले आहे. जनावरांना कत्तलीसाठी बांधून ठेवणाऱ्या इसमांविरुध्द् नवापूर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

तसेच नंदुरबार शहरातील साक्री नाका येथे लावलेल्या नाकाबंदी दरम्यान एक आयशर वाहन (क्र. एमएच १८ – एए ९८०१ यात ९४ हजार रुपये किमतीच्या १३ जनावरांची अवैध वाहतूक करतांना मिळून आला. म्हणून आयशर वाहन चालकाविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियमान्वये
गुन्हा दाखल करण्यात आला असून जनावरांना पांजरपोळ येथे दाखल करण्यात आले आहे.

हे सुध्दा वाचा

Edit Post “Nandurbar News… वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित” ‹ MDTV NEWS — WordPress

Good News…नंदुरबार जिल्ह्यातील मुस्लिम बांधवानी घेतला निर्णय…. ईदला बकरीची कुर्बानी नाही ! | MDTV NEWS

बापरे… पुण्यात पुन्हा एका मुलीवर जीवघेणा हल्ला…! | MDTV NEWS

Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS

त्याचप्रमाणे नंदुरबार शहरात गोमांसाची वाहतूक करणाऱ्या संशयीताकडून ३ हजार २०० रुपये किमतीचे गोमांस तसेच शहादा शहरात गोमांसाची वाहतूक करणाऱ्या संशयीताकडून ५ हजार ६०० रुपये किमतीचे गोमांस जप्त करुन दोन्ही इसमांविरुध्द् संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक अशोक मोकळ, पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ, दिनेशकुमार वसुले, पोलीस नाईक सुरेंद्र पवार, अमोल जाधव, प्रेमचंद जाधव पोलीस अंमलदार विक्की वाघ, दिनेश बावीस्कर, रणजित महाले, गणेश बच्छे, पवन काकरवाल, प्रमोद पाटील, समाधान केंद्रे, हेमंतकुमार महाले, किशोर वळवी यांनी केली आहे.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here