नंदुरबार पोलिसांचे “ऑपरेशन ऑल आऊट”… गुन्हेगारांविरुध्द धडक कारवाई

0
256

नंदूरबार : आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभुमीवर समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या नेतृत्वाखाली १६ जुलै रोजी सायंकाळी ८ ते १७ जुलैच्या सकाळी ६ वाजेदरम्यान नंदुरबार पोलीस दलातर्फे जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट, कोबींग, नाकाबंदी राबविण्यात आले होते.

16 JULLY COMBING PRESS NOTE

पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ऑपरेशन ऑल आऊट राबविणेबाबत नियोजन केले. ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, फरार, पाहिजेत, फेर अटक आरोपी, हिस्ट्रीशिटर्स, गँग हिस्ट्रीशिटर्स, अवैध शस्त्रे बाळगणारे, रात्री घरफोडी करण्याच्या उद्देशात असलेले चोरीच्या वस्तू बाळगणारे, रात्री संशयीतरीत्या फिरणारे, ड्रंक अँड ड्राईव्ह, कारागृहातून सुटुन आलेले आरोपीतांचा शोध घेवुन जास्तीत जास्त गुन्हेगार ताब्यात घेवुन त्यांच्याविरुध्द् कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

१६ जुलै रोजी रात्री ऑपरेशन ऑल आऊट सुरु करण्यात आले. यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील १८ अधिकारी व १२२ अमलदार नेमण्यात आले होते. संपुर्ण ऑल आऊटचे नेतृत्व पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील तसेच अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे हे स्वतः नाकाबंदी,कोंबींग ऑपरेशन, ऑपरेशन ऑल आऊट बाबत सहभागी होवून जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेटी देत होते. नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पवार, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर असे सर्व आप-आपल्या पथकाचे नेतृत्व करुन कारवाई करीत होते.

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEW

१७ जुलै रोजी रात्री १२ वाजता नंदुरबार शहरातील बागवान गल्ली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, दो शाह तकिया इत्यादी परिसरात रूट मार्च करण्यात आला. नाकाबंदी दरम्यान म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील धडगांव रोडवरील चिखली फाटा येथे लावण्यात आलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी करीत असतांना मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर वाहनामध्ये ७ प्लास्टीकच्या कॅनमध्ये ६७ हजार २०० रुपये किमतीचे एकुण २१० लिटर दारु बनविण्यासाठी उपयोगी पडणारे स्पिरीट मिळून आल्याने स्पिरीट व वाहन असा एकुण ३ लाख १७ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन वाहन चालक दिलीप लक्ष्मण पावरा (रा. चुंडीपाडा ता. शिरपूर जि. धुळे) याच्याविरुध्द म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान शहादा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील ५ गुन्ह्यात सन २०२१ पासून पाहिजे असलेला आरोपी प्रदिप शिवलाल ऊर्फ शिवल्या पावरा (रा. ब्राम्हणपूरी ता. शहादा) हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून गुन्ह्याच्या पुढील तपासकामी शहादा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
तसेच नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली परिसरात गणेश उत्तम गोसावी रा. गोसावीवाडा, नंदुरबार हा त्याच्या कब्जात शारीरिक दुखापत करण्यासाठी वापरता येईल असे टोकदार दाते असलेले फायटर कब्जात बाळगतांना बाळगून मनाई आदेशाचे उल्लंघन करतांना मिळून आला म्हणून त्याचेविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEW

चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःचे अस्तीत्व लपवुन संशयास्पदरीत्या फिरत असतांना मिळुन आलेले ७ रेकॉर्डवरील आरोपीतांविरुध्द् महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे विविध पोलीस ठाणे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांचेकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आले. तसेच ५ संशयीत इसमांच्या ताब्यात मिळुन आलेल्या मालमत्तेबाबत समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याच्याविरुध्द् जिल्ह्यातील विविध पोलीस पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नंदुरबार जिल्ह्यात प्रलंबीत असलेल्या नॉन बेलेबल वॉरंटपैकी एकुण २६ नॉन बेलेबल वॉरंट व ४४ बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली. तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखावर असलेले ३७ हिस्ट्रीशिटर्स तपासण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नाकाबंदी दरम्यान ४९७ लहान व २८८ मोठे असे एकुण ७८५ वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEW

नंदुरबार जिल्हा हद्दीतून हद्दपार केलेला इसम विपुल सुरेश कोळी (रा. तिलाली ता. जि. नंदुरबार) हा नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची अथवा न्यायालयाची कोणतीही पुर्व परवानगी न घेता तिलाली येथे मिळून आल्याने त्याच्याविरुध्द् महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पवार, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अमंलदार यांनी केलेली असून पुढील काळात देखील ऑपरेशन ऑल आऊट (कोंबींग व नाकाबंदी) योजना संपुर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here