उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली माहिती
नंदुरबार : – सन. २०२२-२३ या आर्थिक वर्षात उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मोटार वाहन कायद्यातील नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांकडून वायुवेग पथकाद्वारे ४ कोटी ४ लक्ष ६३ हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली आहे.
नंदुरबार उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकामार्फत धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणे, ओव्हरलोड वाहतूक, हेल्मेटचा वापर न करणे अशा विविध गुन्हे करणाऱ्या ५ हजार ६८३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. याबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली माहिती दिली आहे. बिडकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, उद्दीष्टाच्या तुलनेत ही रक्कम १९२ टक्के आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नवीन वाहन नोंदणी, एक रकमी कर, मालवाहू वाहनांचा वाहन कर, परवाना शुल्क, अनुज्ञप्ती शुल्क इत्यांदीच्या माध्यमातून ५६.१७ कोटी रुपये रक्कम जमा झाली आहे. तर सीमा तपासणी नाका, नवापूर येथे आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या ४९ हजार २९८ वाहनांकडून १४ कोटी ३८ लक्ष रूपये तसेच सीमा तपासणी नाका, गवाली (ता. अक्कलकुवा ) येथे २३ हजार १५१ वाहनांकडून ५ कोटी ४० लक्ष रूपये वाहन कर व दंड या स्वरूपात वसूल करण्यात आले आहे.
सन. २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण १४ हजार ८३७ नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली. यात ११ हजार ६०४ दुचाकी, १ हजार ९९९ मोटार कार, ३७३ मालवाहक वाहने, १ हजार ३६९ ट्रॅक्टर्स, १५३ ट्रेलर्स आणि १४४ जेसीबी क्रेन, अँब्युलन्स इत्यादी अन्य वाहनांचा समावेश आहे. मागील वर्षीच्या तुलनेत नवीन नोंदणीमध्ये २ हजार ३५८ वाहनांची वाढ झाली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
ही महसूल वसूली करण्यासाठी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, तसेच कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक तसेच कार्यालयीन कर्मचारी, पोलीस विभाग यांनी विशेष प्रयत्न केले.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार