नंदुरबारच्या भाजीपाला मार्केटमध्ये पहाटे ५ व दुपारी ३ वाजता होणार व्यवहार

0
1346

कृऊबा मार्केटमध्ये कांद्याचे मार्केट सुरू करणार : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांचे आश्वासन

नंदुरबार : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये रात्री २ किंवा ३ वाजता खरेदी- विक्रीचे व्यवहार होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. दरम्यान, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासना नुसार भाजीपाला मार्केटमधील वेळेत बदल करण्यात येणार आहे. मार्केटमध्ये पहाटे ५ व दुपारी ३ वाजता अशा दोनवेळा खरेदी – विक्रीचे व्यवहार होणार असल्याचे माहिती माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.

sp 1145203325 aefmnd thumbnail

नंदुरबार शहरातील भाजीपाला मार्केटमध्ये गेल्या कोरोनाच्या काळात खरेदी विक्रीचा व्यवहार रात्री २ वाजेला सुरू करण्यात आला होता. तो आजतापर्यंत सुरूच आहे. रात्रीच्या सुमारास भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला विक्रीसाठी आणताना शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. अनेकदा रात्रीच्या सुमारास भाजीपाला आणताना वाहने नादुरुस्त किंवा अनेक समस्यांमुळे भाजीपाल्याची वेळ निघून जात असल्याने भाजीपाला दुसऱ्या दिवशी विक्रीला आणावा लागत होता. यामुळे आर्थिक नुकसान तसेच वेळही जात असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

याबाबत शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये अनेकदा वादही उद्भवत होते. यामुळे रात्री २ वाजेच्या या भाजीपाला मार्केटच्या खरेदी विक्रीला शेतकऱ्यांना कंटाळा वाटत होता. मात्र याची उशिरा का असेना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दखल घेतली आहे.

bajar samiti 2 20180476903 1

दरम्यान काल दिनांक १ मे २०२३ रोजी आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी विक्रीचा रात्री दोन वाजेला सुरू असलेला व्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केला. याप्रसंगी माजी आ.श्री. रघुवंशी म्हणालेत की, आता कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा शेतकऱ्यांनी आम्हाला साथ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न आम्ही सोडवू आणि भाजीपाला मार्केटमध्ये रात्री २ वाजता सुरू असणारा भाजीपाला खरेदी विक्रीचा व्यवहार पहाटे ५ वाजता तर दुपारी मार्केट ३ वाजेला सुरू करण्यात येईल असे सांगितले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

पूर्वपट्ट्यात आणि तालुका परिसरात कांद्याची लागवड करण्यात येते. त्यामुळे मार्केटमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. यामुळे शहरालगत भाडेतत्त्वावर किंवा स्वमालकीची जागा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत घेऊन त्या ठिकाणी कांद्याचे मार्केट सुरू करण्यात येईल तसेच व्यापाऱ्यांनीही मार्केटमध्ये शेड उभारण्यात यावे, अशी मागणी केली होती त्यांची देखील मागणी लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here