नंदुरबारच्या जैनम जैनचे युपीएससीत यश

0
223

नंदुरबार: सकारात्मक विचारातून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर वयाच्या २५ व्या वर्षी नंदुरबार येथील जैनम महेंद्रकुमार जैन याने युपीएससी परीक्षेत चौथ्या प्रयत्नात बाजी मारली आहे.

नंदुरबार येथील जैनम जैन हा ड्रायफ्रुट व्यावसायिक महेंद्रकुमार व मंजूदेवी जैन यांचा सुपूत्र आहे. त्याचे १२ वी पर्यंतचे शिक्षण चावरा स्कूलमध्ये झाले आहे तर पुणे येथील फर्ग्यूसन महाविद्यालयातून संख्याशास्त्र विषयातून पदवी पूर्ण केली आहे.यानंतर मात्र, युपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली गाठली अन् वयाच्या २५ व्या वर्षी चौथ्या प्रयत्नात जैनमची दिल्ली वारी यशस्वी झाली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

जैनम देशातून १०३ व्या रँकने युपीएससीमध्ये उत्तीर्ण झाला आहे. जैनम म्हणाला, मी पहिल्यांदा युपीएससी दिली त्यावेळीच मनात वाटत होते की, आपण यशस्वी होणार.मात्र, त्यावेळी अपयश पदरी आले. मात्र, खचून न जाता सातत्याने अभ्यास सुरूच ठेवला होता. सलग तीनदा अपयश आले. मात्र, खचून न जाता प्रयत्न सुरूच ठेवले. यामुळे चौथ्यांदा आता यश मिळाले आहे.

नंदुरबारसारख्या जिल्ह्यातून युपीएससी उत्तीर्ण होवू शकतात. परीक्षा कठीण असल्याची मानसिकता विद्यार्थ्यांच्या यशाला मारक ठरते. आपले शिक्षण कोठेही झाले असले तरी यशस्वी होण्यासाठीचे प्रयत्न प्रामाणिक असले, त्यात सातत्य असले तर यश आपल्या पदरी नक्की मिळते.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here