नाशिक : १९/३/२३
नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण बघता शहरात होणारी वाहनांची गर्दी आणि प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने शहराबाहेर ट्रान्सपोर्ट नगर उभाराव असा आवाहन गडकरी यांनी केलं…
तर द्वारका चौकातील वाहतूक कुंडी सोडवण्यासाठी या ठिकाणी पूल बांधला आता आपण डबल डेकर पूल बांधत आहोत अशी घोषणा यावेळी गडकरी यांनी केली..
कश्मीर ते कन्याकुमारी जोडणारी नाशिक हे मध्यवर्ती स्थान आहे या ठिकाणी भाज्या फळे औषधे साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज बनवले पाहिजे जेणेकरून माल खराब होण्याचे प्रमाण कमी होऊन वाहतूक करणे सोपे होईल..
भविष्यात नाशिक देशाची लॉजिस्टिक कॅपिटल व्हावं आणि त्यासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशन न पुढाकार घ्यावा असा आवाहन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं….
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ऑल व्हील डिस्प्ले संकल्पनेतून नाशिक शहरात ऑटो अँड लॉजिस्टिक एक्सपोज आयोजन करण्यात आलं होतं..
नाशिक येथील कालिदास कला मंदिर सभागृहात ऑटो अँड लॉजिस्टिक सिमेंटचे आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी बोलत होते…
जैविक इंधन तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी संधी असल्याचे ते म्हणाले…
भविष्यात लॉजिस्टिक क्षेत्रात मोठे परिवर्तन घडणार त्यासाठी ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीने तयार राहावं असा आवाहन त्यांनी केलं… यावेळी त्यांच्या हस्ते लोगोचं अनावरण करण्यात आलं..
व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते..
तेजस पुराणिक जिल्हा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज नाशिक