विद्यार्थ्यांची काढली बालदिंडी..विठुरायाचा केला जयघोष
नाशिक -२८/६/२३
आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी , ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे.हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात.
विविध भागातून लाखो वारकरी जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल याचा जयघोष करीत दिंडी काढून आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होतात ..
या एकादशीचा उत्साह आणि रेलचेल शैक्षणिक परिसरात अर्थात विविध शाळांमधून अनोख्या कार्यक्रमातून साजरी होते .. असाच प्रत्यय आला नाशिकच्या सेंट्रल हिंदू मिलिटरी एजुकेशन संस्थेच्या शिशुविहार बालवाडी विभागाच्या मराठी माध्यम शाळेत .. जेव्हा चक्क पारंपरिक वेशभूषेत बाल चिमुकले वारकऱ्यांच्या वेशात शाळेत अवतरतात .. तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावतात आणि शाळा बनते प्रति पंढरपूर ..
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
आज मंगळ दि २७ जुन रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधत शिशुविहार बालवाडी (मराठी) येथे बालदिंडीचे आयोजन करण्यात आले .. शाळेला जणू प्रति पंढरपूर चे स्वरूप प्राप्त झाले होते .. यावेळी विद्यार्थ्यांनी भजन सादर केले . विठुनामाचा गजर केला . पालखी पूजन करून दिंडी सुरु झाली . यावेळी मुलींनी पालखी समोर फेर धरला ,फुगड्या खेळल्या . मुलांनी दिंडीचा खुप आनंद घेतला . यावेळी वरुणराजाने २ मि . हजेरी लावून बालदिंडीत प्रत्यक्ष पाडूरंगानेच जणू उपस्थिती लावली होती ..
हे सुध्दा वाचा
बापरे… पुण्यात पुन्हा एका मुलीवर जीवघेणा हल्ला…! | MDTV NEWS
Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन |
यावेळी शालेय समितीच्या अध्यक्षा सुवर्णा दाबक यांच्या हस्ते विठ्ठल रुख्मिणी पूजन व आरती करण्यात आली . यावेळी शिक्षिकांनी रिंगणात भजनाच्या तालावर फेर धरला ..मुलांना राजगिरा लाडूचा प्रसाद देण्यात आला .. “बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ” चा जयघोष करीत सर्वांनीच मनमुराद आनंद लुटला .. वारीचा अनुभव प्रत्यक्ष सहभागातून घेऊन विठूमाऊलीचे दर्शन घडल्याचं समाधान मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतांना पाहावयास मिळालं .. या उपक्रमाला संस्थेचे सरकार्यवाह हेमंत देशपांडे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्य , शालेय समितीच्या अध्यक्षा सुवर्णा दाबक ,संस्थेचे शिक्षणाधिकारी एस डी कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आणि त्यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल शाळेचे आणि सर्व शिक्षिका ताईंचे अभिनंदन केले .. शाळेच्या विभाग प्रमुख वैशाली भट यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सर्व शिक्षिका ताई आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली ..
तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज,नाशिक