नाशिक -१६/७/२३
नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर हद्दीत अवैध अग्नी शस्त्रे व हत्यारे बाळगणारे गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याकरता दरोडा व शस्त्रविरोधी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव, सिताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी या गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या..
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे हि वाचा :
NASHIK :शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न ..
TALODA:पालखी मिरवणुकीतून केला संत शिरोमणी महाराजांचा जयघोष …
या पथकास 12 जुलै रोजी गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली कि सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत वैभव लहामगे वय वर्ष 30 राहणार शिवपुरी चौक श्री स्वामी समर्थ नगर सिडको नाशिक हा सातपूर हद्दीत येणार असून त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व काडतुसे आहेत. सदर माहितीवरून पथकाने सापळा रचला. आणि पथकाने अतिशय शिताफीने या इसमास ताब्यात घेतले. एक देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसांसह पकडले .. शस्त्र अधिनियम कलम 3/25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 /1/3 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कामगिरी अंकुश शिंदे पोलीस आयुक्त नाशिक शहर तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर प्रशांत बच्छाव, यांच्यासह सिताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.. या पथकातील प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे, पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी, मोहन देशमुख, प्रवीण चव्हाण, पोलीस अंमलदार संदीप डावरे, महेश खांडबहाले,महेंद्र साळुंखे , पोलीस अंमलदार विशाल जोशी, महिला पोलीस अंमलदार मनीषा कांबळे यांनी ही कामगिरी संयुक्तरित्या यशस्वीपणे पार पाडली आहे..
तेजस पुराणिक, जिल्हा प्रतिनिधी,एम डी टीव्ही न्यूज नाशिक