नाशिक विभाग शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) ची बैठक संपन्न

0
172

नाशिक -२६/४/२३

नाशिक विभाग शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ)ची बैठक आज सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी कालिका मंदिर सभागृह, जुना आग्रा रोड, नाशिक. येथे नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार माननीय सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत व नाशिक विभाग टीडीएफचे अध्यक्ष माननीय श्री संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी माजी पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, महाराष्ट्र राज्य टीडीएफ चे कार्यवाह हिरालाल पगडाल, नाशिक विभाग टीडीएफचे कार्यवाह, अरविंद कडलग, खजिनदार मोहन चकोर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
टीडीएफ बळकट करण्यासाठी संघटनेची नोंदणी करणे, नियमित बैठक घेऊन टीडीएफची पंचसूत्री विचार सर्वांपर्यंत पोहोचवणे, नवीन सभासदांना संघटनेमध्ये सहभागी करून घेणे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

संघटना बळकट करणे व शिक्षकांच्या प्रश्नांसाठी एकत्र येऊन पाठपुरावा करणे. अत्यंत गरजेचे असल्याचे नाशिक विभागाचे पदवीधर आमदार श्री. सत्यजित तांबे यांनी प्रतिपादन केले.

1 12
1
2 11
2
3 11
3

या बैठकीत पुढील विषयांवर चर्चा करण्यात आली.
१ शिक्षक शिक्षकेतरांच्या विविध प्रश्नांवरती विचार करणे.
२ प्रत्येक जिल्ह्यातील संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेणे.
३ प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येणे.
४. नाशिक विभागातील विविध शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी मा. आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली समिती गठन करणे.
५.शासनाने बंद केलेल्या भरतीमुळे शिक्षकांवर ती अतिरिक्त ताण पडतो त्यासाठी भरती सुरू करण्यास प्रयत्न करणे. ५.नाशिक विभागातील तालुका व जिल्हा कार्यकारणीच्या लोकशाही पद्धतीने निवडणुका घेणे.
६. नाशिक विभाग टीडीएफ कार्यकारिणीच्या सदस्यांची निवड करणे.
इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी सभासद नोंदणी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी. नवीन कार्यकर्त्यांना संघटनेमध्ये संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणे.
शिरपूर जिल्हा धुळे येथे मे महिन्यात कार्यकर्त्यांचे विभागीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे व संगमनेर तालुका अहमदनगर येथे येत्या दोन महिन्यात राज्यस्तरीय टीडीएफ कार्यकर्ते प्रशिक्षण शिबिराचे आयोजन व त्यानंतर जळगाव नंदुरबार व नाशिक येथे शिबिरांचे आयोजन करण्याचे ठरले.
शिक्षक- शिक्षकेतरांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्याबाबत मार्गदर्शन विभागीय अध्यक्ष संजय पवार यांनी केले.
यावेळी शिवाजीराव निरगुडे, बाळासाहेब सूर्यवंशी, नानासाहेब देवरे, रवींद्र मोरे, निशांत रंधे, आर एस बाविस्कर, सुरेश झावरे, गुफरान अन्सारी, एसबी शिरसाट, सीपी कुशारे, अरुण पवार, बाळासाहेब ढोबळे, भाऊसाहेब शिरसाट, भारत गांगुर्डे, दीपक व्याळीज, रामराव बनकर, नीलिमा आहेर, भारत सातपुते, मोईन शेख, मंगेश सूर्यवंशी, किशोर जाधव, समीर जाधव, बाबासाहेब खरोटे, चंद्रशेखर सावंत, सचिन पगार, संजय पाटील यांच्यासह नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार येथील टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तेजस पुराणिक ,नाशिक जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here