Sarangkheda : वय अवघे सहा ते १९ वर्षाच्या दरम्यान, मात्र त्या चौघा रनरागिनींची जिद्द वाखणन्याजोगी. नाशिक (Nashik) येथून आपल्या प्रशिक्षकांसमवेत प्रवासास सुरुवात केल्यानंतर या अश्वप्रेमी रणरागिनींनी मजल दर मजल करत अवघ्या पाच दिवसात २५० किलोमीटरचे अंतर पार करून सारंगखेडा येथील अश्वमेळा गाठला. यावेळी गावाच्या वेशीवर त्यांचे जल्लोषात चेतक फेस्टिवल (Chetak Festival Sarangkheda ) चे अध्यक्ष जयपाल सिंह रावल यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार , सरपंच पृथ्वीराज रावल , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी , चेतक समितीचे आयोजक प्रणवराजसिंह रावल , विनित गिरासे यांच्यासह नागरिकांनी स्वागत केले.
नाशिक येथून (ता.१९)ला त्या चौघी जणी सारंगखेड्याकडे निघाल्या. मुली असल्या म्हणजे काय झाले अंगी जिद्द व चिकाटी कायम ठेवून मागे न पाहता अश्व आणि सैन्य दलात सहभागी होण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून २५० किलोमीटरचे अंतर पार करुन जनजागृती करीत (ता.२३) सारंगखेडा गाठले. रस्त्यात प्रवासादरम्यान ठिक ठिकाणी ग्रामस्थांकडून त्यांच्यावर स्वागतासाह कौतुकांचा वर्षाव करण्यात आला.
(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
प्रशिक्षकांसमवेत गाठला अश्व बाजार…..
नाशिकहून निघालेल्या या अश्व रणरागिणी आहेत कु. हृदया पृथ्वीराज अंडे (वय १५)इयत्ता १०वी, कु. स्वरांगी कुणाल अंडे (वय १४) इयत्ता ९ वी, कु. प्रतीक्षा सोमनाथ मुंजे (वय १९) इयता १२ वी आणि कु. जागृती उदय गांगुर्डे (वय ११) इयता ६ वी. त्यांच्या सोबत आहेत त्यांचे प्रशिक्षक विशालराजे भोसले. या सर्वांनी (ता. १९ ) नाशिक येथून प्रवासास सुरुवात केली. दररोज अश्वावर स्वार होत ३५ ते ४० किलोमिटरची रपेट करीत त्या पाच दिवसात सुमारे २५० किलोमिटर अंतर पार करीत सारंगखेड्याला पोहोचल्या.
- Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
- Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
अनोख्या शैलीचे कौतुक…..
आजच्या मुला-मुलींना अश्व,आपल्या संस्कृतीतील महत्त्वाचा घटक असलेली यात्रा आणि फेस्टिव्हलची माहिती मिळावी तसेच आज मुली मागे न राहता त्यांच्यात अश्व आणि सैन्यदलाची आवड निर्माण व्हावी म्हणून जनजागृतीचा त्यांचा मनोदय आहे. त्यानुसार त्या येताना रस्त्यातील गावागावात जनजागृती करीत आल्या. या मुलींचा गावागावात स्वागत करण्यात आले. त्यांच्या या अनोख्या शैलीचे कौतुक होत आहे. मागील वर्षी १४ वर्षीय हृदया पृथ्वीराज अंडे घोडयावर स्वार होत नाशिक ते सारंगखेडा हे सुमारे २५० किलोमिटर अंतर पार करत चेतक फेस्टिवलसाठी आली होती. ती नऊ वर्षाची असतांना तिने अश्व सवारी सुरू केली असून तिला विशाल भोसले यांनी प्रशिक्षण दिले आहे.
सारंगखेडा प्रतिनिधी – गणेश कुवर