कृषी, पर्यटन आणि शैक्षणिक हब प्रमाणे नाशिक ऑटो हब म्हणून विकसित व्हावं – छगन भुजबळ..

0
167

नाशिक -७/५/२३

नाशिक ज्याप्रमाणे कृषी, पर्यटन आणि शैक्षणिक हब म्हणून नावाजल जात आहे. तसेच नाशिक हे ऑटो हब म्हणून विकसित व्हावं असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिकमध्ये ठक्कर डोम येथे आयोजित ऑटोथॉन प्रदर्शनास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते नामवंत रायडर्सना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.

aotonsk
1
aotonsk.jpg1
2
aotonsk.jpg2
3
aotonsk.jpg3
4
aotonsk.jpg4
5

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार सीमा हिरे, डॉ.शेफाली भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, आयोजक संजय न्याहारकर, साहिल न्याहारकर, अश्विनी न्याहारकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की,
नाशिकच्या विकासासाठी नवनवीन कार्यक्रम नाशिकमध्ये नियमित व्हायला हवे. कृषी आणि पर्यटनात नाशिक अगदी पुढे आहे. बोट क्लब सारखा प्रकल्प आपण नाशिकमध्ये केले असून ते यशस्वी सुरू आहे. नाशिक जसे कृषी, पर्यटन, शिक्षण हब म्हणून नावाजल जात आहे. तसेच नाशिकला ऑटो हब होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी ऑटोथॉन हा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, अपघाताला आळा घालण्यासाठी योग्य प्रशिक्षण घेऊन नियमांचे पालन करून वाहने चालविण्याची आवश्यकता आहे. समृध्दी सारख्या रस्त्यांचा विकास आपल्याकडे होत आहे. मात्र नियमांची पायमल्ली होत असल्याने अपघातांचे प्रमाण अधिक वाढत आहे ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, नाशिकमध्ये ऑटोथॉन प्रदर्शन हे दरवर्षी भरवल जावं. या माध्यमातून नावीन्यपूर्ण वाहने नागरिकांसमोर येतील तसेच नाशिकच्या विकासासाठी या प्रकारची प्रदर्शने अतिशय उपयुक्त ठरतील असे सांगत या उपक्रमाबद्दल आयोजक न्याहारकर यांचे कौतुक केले.

यावेळी छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकच नाव जगभरात गाजवलेल्या नामवंत रायडर्सचा ऑटोथॉन सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here