गाणी आमची आणि तुमची कार्यक्रमातून नाशिककर मंत्रमुग्ध..

0
740

नाशिक -२०/५/२३

महाराष्ट्रसह देशाला मिळालं एक अभिजात संगीत..

जुन्या काळातील दिग्गज गायकांच्या आवाजातील गाणी आणि त्यांचे स्वर आजही आपल्या सुश्राव्य गायनातून ऐकवतात नाशिक शहरातील नादब्रम्हात आनंद शोधणारे स्वरयात्री हे दोघे डॉक्टर..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

बघा ना व्यवसायाने डॉक्टर आहेत पण स्वरांच्या दुनियेची सफर घडवणारे हे संगीत प्रेमी डॉक्टर अवलीयाच..
नादब्रम्हात आनंद शोधणारे हे स्वर साधक आहेत नाशिक शहरातील नामांकित फिजियोथेरेपीस्ट डॉक्टर विशाखा जगताप आणि नामांकित नेत्रतज्ञ डॉक्टर नितीन कानडे सर..

20 मे शनिवारची आजची संध्याकाळ कुसुमाग्रज प्रतिष्ठान विशाखा हॉल सभागृहात या दोन डॉक्टर जोडीच्या स्वराभिषेकातून रसिकांच्या उपस्थितीत कधी सुरू झाली आणि कधी संपली हेच कळेना..

कारण जुन्या गाण्यांनी आणि नव्या गाण्यांचा संगम करून गाण्यांचा आस्वाद दिला या डॉक्टर जोड गोळीने..

एकाहून एक अशी सरस गाणी त्यांनी सादर केलीत..

5c16dd29 92ea 4967 8c45 34bfed86ec0c
b91ab7d8 b23f 4c9e 9d99 103eaf5e6adf
95bfe875 bade 433d b2bf d0a570614d65

उपस्थित रसिक देखील मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.. ही सायंकाळ अधिकच गोड होती..

व्यवसायाने डॉक्टर असलेले परंतु संगीताची गोडी आणि संगीताची आवड जपणाऱ्या या दोन्ही डॉक्टरांनी गाणे म्हणायला वयाची अट नसते हे सर्वांसमोर आपल्या स्वराभिषेकातून सिद्ध केलं..

डॉक्टर नितीन कानडे नाशिक शहरात सायंकाळी आपला द लिजेंड कराओके क्लब चालवतात त्या माध्यमातून व्यवसाय करून संगीताची आवड जोपासणाऱ्यांसाठी गाण्याचं व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलंय.. त्यामुळे संगीत प्रेमी यांना स्वतःला आजमवण्याची यातून संधी मिळते.

डॉक्टर विशाखा जगताप यांना लहानपणापासून गाण्याची आवड आहे याविषयी त्यांनी एम डी टी व्ही शी बोलताना प्रतिक्रिया दिली .. ऐकू या काय म्हणाल्या..

तर कराओके च्या माध्यमातून स्वतःसोबत इतरांना देखील गाण्याची संधी देणारे एकमेव डॉक्टर कानडे सर उत्तम गायन करतात. नेमकं त्यांनी काय अनुभव कथन केलं ऐकू या..

यावेळी डॉक्टर विशाखा जगताप यांनी बय्या ना धरो बालमा हे गीत सादर केलं..

या गीताच्या तालावर टाळ्यांचा ठेका धरला.. तर डॉक्टर विशाखा जगताप आणि डॉक्टर नितीन कानडे यांनी ड्युएट गीत मी डोलकर डोलकर दर्याचा राजा हे गीत सादर केलं..

यावेळी डॉक्टर विशाखा यांनी केतकीच्या बनी तिथे, रुपेरी वाळूत माडांच्या बनात, बाहो मे चले आओ, ओ मेरे सोना रे सोना, आओ हुजूर तुमको, ओ सजना बरखा बहार, लग जा गले, सायोनारा या बहारदार गीतांची बरसात केली.. तर डॉक्टर नितीन कानडे यांनी दिल को देखो चेहरा ना देखो, मनाच्या धुंदीत लहरीत ये ना, देखा है तेरी आखो मे, मेरे नैना सावन, एक धागा सुखाचा, होटो से छू लो तुम या बहारदार गीतांनी रसिकांची दाद मिळवली.. उत्तरोत्तर हा कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला.. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सभापती तथा नगरसेवक सुरेश आण्णा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.. कार्यक्रमाचे निवेदन नाशिकच्या निवेदिका भावना कुलकर्णी यांनी केले.. .. यावेळी मोठ्या संख्येने संगीत प्रेमी रसिक, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते..

तेजस पुराणिक,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नाशिक