राष्ट्रीय पँथर्स आघाडी: विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयास भेट..

0
176

पालघर : २९/३/२०२३

राष्ट्रीय पँथर्स आघाडीच्या वतीने आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अविश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यालय पालघर येथे विविध प्रलंबित प्रश्न तसेच नव्याने निर्माण झालेल्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी साहेब पालघर , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर , उपविभागीय अधिकारी पालघर यांना प्रत्यक्ष भेटून विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आल्या.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणिजॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
यावेळी जिल्ह्यातील नगर परिषद ,नगरपालिका , नगरपंचायत हद्दीत तसेच ग्रामपंचायत हद्दीतील गटई काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्न , प्रलंबित प्रश्न तसेच नव्याने निर्माण झालेल्या अनेक महत्वपूर्ण विषयांवर त्वरित कारवाई बाबत संबंधित अधिकाऱ्यांमार्फत आश्वासित करण्यात आले.

तसेच अनेक विभागांना भेटी देऊन पाठपुरावा करण्यात आला.
यावेळी पालघर जिल्हा अध्यक्ष विनायक जाधव , पालघर जिल्हा कार्याध्यक्ष तथा पालघर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संतोषजी कांबळे , पालघर जिल्हा महिला अध्यक्ष विदयाताई मोरे , पालघर जिल्हा सचिव रमाकांत गायकवाड , डहाणू तालुका उपाध्यक्ष सिराज शेख , बोईसर शहर अध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे , वाणगाव शहर महिला अध्यक्ष सोनाली ताई जाधव , वाणगाव शहर संघटक आनंद दुबळा , सफाळे विभाग कार्यकारणी लालचंद निषाद , सफाळे विभाग कार्यकारणी देविदास बर्वे व गटई कामगार कार्यकर्ते तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ऋषीकेश जाधव,पालघर प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here