नवापूर : चक्रीवादळातील नुकसानीची आमदारांनी केली पाहणी

0
222

नवापूर : तालुक्यात चक्रीवादळात नुकसान झालेल्या गावांना भेटी देऊन आमदार शिरीषकुमार नाईक यांनी नुकसानीची पाहणी केली. शासनाच्या आपत्कालीन निधीतून तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार नाईक यांनी यावेळी दिले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नवापूर तालुक्यातील कामोद ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घिसलीपाडा गावात चक्रीवादळामुळे अनेक घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी आमदार शिरीषकुमार नाईक यांनी केली. यावेळी आदिवासी काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष आर.सी.गावीत, संदीप गावीत, विक्रम गावीत, जैंत्या गावीत, पास्टर काशिराम गावीत, दिलीप गावीत, जेरम्या गावीत आदि उपस्थित होते.

हे सुध्दा वाचा

शिरपूर तालुका पोलीस : अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन ताब्यात .. – MDTV NEWS

कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार मध्यान्ह भोजन : पालकमंत्री डॉ.गावित – MDTV NEWS

संपूर्ण नवापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची ताबडतोब आपत्कालीन निधी मधून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन आमदार नाईक यांनी नुकसानग्रस्तांशी चर्चा करतांना दिले. याबाबतीत नवापूर तहसिलदार यांच्याशी संपर्क करुन योग्य त्या सुचना करण्यात येतील असेही त्यांनी सागितले.

एमडी.टीव्ही. न्युज नवापूर – नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here