Navapur News: भीषण अपघात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक..तरुण ठार

0
717

Navapur News :- भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने दुचाकीला समोरून दिलेल्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा भीषण अपघात राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील नवापूर-धुळे रस्त्यावर झाला. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

navapur news

हे सुध्दा वाचा

Nandurbar News… वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित | MDTV NEWS

Good News…नंदुरबार जिल्ह्यातील मुस्लिम बांधवानी घेतला निर्णय…. ईदला बकरीची कुर्बानी नाही ! | MDTV NEWS

नंदुरबार पोलिसांनी रोखला अजून एक बालविवाह … पळून जावून विवाह करणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलीचे केले समुपदेशन ! | MDTV NEWS

Nandurbar Police… कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या १२८ गोवंशाची केली सुटका…! | MDTV NEWS

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २८ जून रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान सुरतकडून धुळ्याकडे जाणारा ट्रकने (क्रमांक जीजे.०९- एव्ही. ८५२९) समोरून येत असलेल्या मोटरसायकलला (क्र.एमएच.३९- पी.५४६) धडक दिली. हा अपघात नवापूर तालुक्यातील सावरट गावालगत घडला असून मोटरसायकल चालक महेंद्र अमृतसिंग गावित यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

Nandurbar News… वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित | MDTV NEWS

Good News…नंदुरबार जिल्ह्यातील मुस्लिम बांधवानी घेतला निर्णय…. ईदला बकरीची कुर्बानी नाही ! | MDTV NEWS

नंदुरबार पोलिसांनी रोखला अजून एक बालविवाह … पळून जावून विवाह करणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलीचे केले समुपदेशन ! | MDTV NEWS

Nandurbar Police… कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या १२८ गोवंशाची केली सुटका…! | MDTV NEWS

अपघाताबाबत माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातात ट्रकचे चाक तरुणाच्या डोक्यावरून गेल्याने घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता. पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिकेला फोन करून घटनासाठी येण्याबाबत कळविले. चालक लाजरस गावित हे रुग्णवाहिका घेऊन दाखल झाले. मयत तरुणाचा मृतदेह नवापूर उप जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला.याठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here