नवापूर : बर्डीपाडा टोलनाक्याच्या कठड्यावर वाहन धडकले

0
165

एका महिलेचा मृत्यू ; अपघातात ८ जण जखमी

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा फाट्याजवळील टोल नाक्याच्या कठड्याला चारचाकी वाहन धडकल्याने एकजण ठार तर ८ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा फाट्याजवळ टोल नाकाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान याठिकाणी सुरू असलेल्या कामाबाबत वाहनांना ये – जा करण्यासाठी कोणतेही दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांना दररोज अपघातांना सामोरे जावे लागत आहे. याठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

दरम्यान, काल रात्री गुजरात राज्याकडून धुळेकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन टोल नाक्यावरील कठड्याला जाऊन धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला प्रवासीचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला असून वाहनातील ८ जण जखमी झाले आहेत.

या अपघातात वत्सला गोवर्धन सोनवणे या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर हरीश मनोहर भालेराव, राहुल यशवंत नगराळे, सावित्री राहुल नगराळे, सरिता दीपक सोनवणे, प्रिया राजेंद्र सोनवणे, मानसी राजेंद्र सोनवणे, मनोज आधार सपकाळे, दक्ष राहुल नगराळे सर्व राहणार अलका पार्क वसरापूर स्टेशन रोड अहमदाबाद हे जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस व स्थानिक ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची नोंद केली आहे.
* एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here