नवापूर काँग्रेस कमिटीने केला केंद्र सरकारचा निषेध..

0
139

नवापूर/नंदुरबार :२८/३/२३

सुरत कोर्टाने नुकताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मानहानी खटल्यात दोषी ठरवत दोन वर्षाची शिक्षा सुनावली..

त्यामुळे त्यांना खासदारकी गमवावी लागली..

केंद्र सरकारच्या या भूमिकेचा निषेध म्हणून नवापूर काँग्रेसकडून निषेध मोर्चा काढण्यात आला

मानहानी खटल्यात राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयांना त्यांची खासदारकी रद्द केली..

याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक झाली..

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात निषेध मोर्चाच्या माध्यमातून सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली..

तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं..

रजनी शिरीष नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

शिवाजी गावित, राया मावशी दामू बिराडे बबीता गावित, ललिता वसावे दशरथ गावित जालमसिंग गावित सोहेल बलेसरिया, रोशन गावित, फारुक शाह आशिष मावशी फैजल शेख विलास वसावे गणेश वसावे देवा कोकणी अजित वळवी क्षितिज गावित चेतन वसावे यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…
नारायण ढोडरे,नंदुरबार ग्रामीण प्रतिनिधी ,एम.डी. टी.व्ही. न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here