राष्ट्रवादीने स्वखर्चातून केली तळोद्यात स्वच्छतादूतांची नेमणूक

0
239

नंदुरबार :- तळोदा शहरातील प्रत्येक कॉलनी व गल्लींमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. संपूर्ण शहरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असून शहरातील स्वच्छतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वखर्चाने चार स्वच्छतादूतांची नेमणूक करण्यात आली आहे.

तळोदा नगरपालिकेमध्ये स्वच्छता विभागाचे ३८ कर्मचारी असून फक्त १० ते १२ कर्मचारी हे तळोदा शहरातील स्वच्छतेसाठी काम करत असतात. इतर कर्मचारी कुठे असतात, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली. शहरातील अनेक वसाहती, गल्लींमध्ये स्वच्छता कर्मचारी येत नसल्यामुळे तेथील गटारी, कचरा उचलण्यात येत नाही. यामुळे तेथील परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन दुर्गंधी पसरत असते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

तळोदा नगरपालिकेवर गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासक आहे. परंतु नागरिक आपापल्या प्रभागातील नगरसेवकांना फोन करून सांगत असतात की गटारी साफ करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी पाठवा, कुत्र मेलेले आहे कर्मचारी पाठवा, अश्या विविध कामासाठी फोन करून सांगत असतात. माजी नगरसेवक हे पालिकेत फोन करून सांगतात तेव्हा पालिकेकडून स्वच्छतेचे टेंडर निघाले नाही आहे, कर्मचारी नाही आहे अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.

यामुळे तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष योगेश मराठे, माजी बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, माजी नगरसेविका अनिता परदेशी, संदीप परदेशी यांनी तळोदा शहरासाठी चार स्वच्छतादुतांची नेमणूक स्वखर्चाने करून दिली आहे. हे स्वच्छता दुत संपूर्ण शहरातील कुठल्याही भागात गटार भरलेली असो किंवा इतर स्वच्छतेच्या कामासाठी तत्पर असणार आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

राष्ट्रवादी काँग्रेसने तळोदा शहरासाठी नेमलेल्या या स्वच्छता दुत कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी या स्वच्छतादूत लोकार्पणच्या कार्यक्रमाला शहादा-तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी, खरेदी विक्री संघाचे संचालक चंदू भोई, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष आरिफ शेख नुरा, याकूब पिंजारी, साबीर आली सब्दार अली, मुश्ताक अली, शेख रफिक, सईद पठाण, संजय राणे,नासीर हारून, माजी नगरसेवक गणेश पाडवी, सरचिटणीस महेंद्र पोटे, खजिनदार धर्मराज पवार, संघटक राहुल पाडवी, शहर उपाध्यक्ष अनिल पवार, युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे, नितिन वाघ युवा सरचिटणीस इंद्रजीत राणे, वैभव कर्णकार, कार्तिक राजकुळे, इमरान शिकलीकर, प्रकाश पाडवी यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महेंद्र सूर्यवंशी आणि सुशील सूर्यवंशी. एम.डी.टी.व्ही. न्युज तळोदा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here