NCP PROTEST:मणिपूर घटना : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे तीव्र निषेध,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ..

0
643

तळोदा /नंदुरबार -२५/७/२३

NCP PROTEST:मणिपूर येथील आदिवासी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढून त्यांच्यावर सामुहीक बलात्कार केला. या घटनेमुळे देश हादरला आहे व माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.या घटनेचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हा तर्फे तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना देण्यात आले.
जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मणिपूर येथील आदिवासी समाजातील दोन महिलांना नग्न अवस्थेत धिंड काढून सामुहीक बलात्कार केला. या घटनेमुळे देश हादरला आहे व माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

हे हि वाचा : https://tinyurl.com/2uy69prr

TALODA : मणिपूर घटनेचे पडसाद : तळोद्यात विविध संघटनांनी काढला निषेध मोर्चा ..


आपल्या संस्कृती प्रधान देशात अश्या घटना घडत आहेत हे दुर्दैवच म्हणावे लागेल. आपण स्त्रीला देवी म्हणणारे आणि मानणारे कुठे गेले? काय घडत आहे या देशात? नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा करायचा, तेव्हा मोठे मोठे शब्द वापरुन स्त्री म्हणजे देवीचा, दुर्गेचा अवतार फक्त उपमा पुरतेच का? स्त्रीच्या बाबतीत अशा पध्दतीने वागणार्‍या नराधमांना तत्काळ अटक करुन कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हातर्फे करण्यात आली आहे.
निवेदन सादर करतांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, युवक जिल्हाध्यक्ष नितीप जगताप, महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा अनिता परदेशी, मंजुळा पाडवी,.हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी,योगेश मराठे, एन.डी.पाटील,केसरसिंग क्षत्रिय, बाळासाहेब मोरे,राहुल पावरा, मिलीन जाधव,नरु जगताप, बिपीन पाटील,ईश्‍वर शांतू गावीत,इकबाल शेख,हितेश धिवरे,सचिन पावरा,सिमा चव्हाण,प्रमिला ठाकरे,सुनिल राजपूत,गोलु राजपूत,कुणाल पाडवी,प्रतिक पाटील,शुभम कुवर मिरज शेख,नरेश पवार,सरपंच विलास वळवी,आरीफ शेख नुरा,राहुल पाडवी,अनिल पवार,गणेश राने,याकूब पिंजारी, देवेश मगरे, शोभाताई क्षत्रिय,.निकिता राणे,.गायत्री क्षत्रिय,मोनाली पाडवी,गणेश भामरे,इंद्रजीत राणे,इमरान शिकलीकर,सुदाम टेलर,साबीर मिस्त्री,मुस्ताकअली कालुमिया,शोएब पठाण,नईम बागवान,विकास खाटीक,दिनेश भ्रामने,सोनू सोनवणे,तसेच मोठ्या संख्येत राष्ट्रवादिचे कार्यकर्ते, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here