राष्ट्रवादीचा निर्णय झाला : अध्यक्षपदी शरद पवारच राहणार

0
187

कार्यकर्त्यांचा भावनांचा मी आदर करतो : पत्रकार परिषदेत शरद पवार झाले भावनिक

मुंबई :- काही दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्तीचे संकेत देत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. यावरून पक्षांतर्गत मोठ्या हालचाली देखील सुरू झाल्या होत्या. मात्र, कार्यकर्त्यांचा रोष व होत असलेले आंदोलन पाहता आज शरद पवार यांनी आपला निर्णय जाहीर केला. पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचा निर्णय मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या निर्णयावर राजकीय वर्तुळात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. राष्ट्रवादीतर्फे पक्षांतर्गत एक समिती नेमण्यात आली. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून समितीच्या बैठकीत ठराव देखील करण्यात आला.

तर पवार यांच्या निर्णयामुळे पक्षात मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. अनेकांनी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून राजीनामा मागे घेण्यासाठी शरद पवार यांना साकडेच घातले.आज (दिनांक 5 मे ) रोजी सायंकाळी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी आपला निर्णय जाहीर केला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

६६ वर्षाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कारकीर्द नंतर आता येथून निवृत्त व्हावे, अशी माझी इच्छा होती. मात्र या निर्णयामुळे जनमानसात तीव्र भावना उमटल्याने मी निर्णयाचा फेरविचार केल्याचे पवार यांनी जाहीर केले. मी जनमानसांच्या भावनेचा आदर करून त्यांनी जे प्रेम दिले याने भारावून गेलो आहे. मी घेतलेल्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी आपण सर्वांनी केलेल्या आवाहनाचा मी आदर करतो. मी घेतलेला निर्णय मागे घेत असल्याचे शरद पवार यांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे आता या विषयावर पडदा पडला आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्यूरो, मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here