धुळे -४/५/२३
जगातील पहिले लिक्वीड डि ए पी देशाला दि.२६ एप्रिल रोजी देशाचे गृह आणि सहकार मंत्री नां.अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे लोकार्पण करण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सध्या देशात खताची मागणी व तुटवडा बघता नॅनो युरीया लिक्वीड व नॅनो डि ए पी लिक्वीड निमिर्ती इफको कंपनी ने केले असून भारत सरकारचे मोठे सहकार्य मिळत आहे.
हे खत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी व कमी खर्चात उपलब्ध होणार आहे.
डि ए पी च्या वापरामुळे शेती पाणी माणसावर हानिकारक नसुन सुरक्षित आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतूक व साठवणुक खर्च ही कमी होणार आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नॅनो लिक्वीड डि ए पी वापर काळाची गरज असल्याचे इफकोचे व्यवस्थापक कलीम शेख यांनी प्रतिपादित केलं ..
लिक्वीड डि ए पी भारतात गुजरात राज्यातील कांडला आणि ओडिसातील पारदिप येथील युनिट मध्ये आत्मनिर्भर भारत योजनेत कृषी ध्येय साध्य करण्यात येत आहे.
वर्षात २५ लाख टन डि ए पी म्हणजे ५ कोटी बाटल्या तयार होतील व २०२५/२६ मध्ये १८ कोटी बाटल्या तयार करण्याचे उद्देश आहे.
कमी खर्चात शेतकऱ्यांना नायट्रोजन व फॉस्फरसची पुर्तता होणार आहे.
त्यामुळे भारताला आयातीवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
भारत सरकारच्या “सहकार से समृध्दी”आणि आत्मनिर्भर भारत या स्वप्नांच्या अनुषंगाने नॅनो डि ए पी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे आणि चांगले भविष्य घडविण्याच्या उद्देशाने विकसित केल्याचे इफको चे अध्यक्ष दिलीप संघांनी व संचालक डॉ. उदय अवस्थी यांनी सांगितले.
MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे