घरी अठराविश्व दारिद्रय … आई वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकीत असताना त्यांना कामात हातभार लावत पिलखोड येथील युवती मुंबई पोलीस झाली आहे. नेहा मोरे हिच्या अथक परिश्रमाला यश आले असून तिची काल मुंबई पोलीस म्हणून निवड झाली आणि ही बातमी कळताच तिच्या आई _ वडिलांच्या आनंदाला पारा उरला नाही.
चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड या खेडेगावातून नेहा शामराव मोरे (कोळी) जिद्द.. चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मुंबई पोलीस बनली आहे. नेहाचे वडील शामराव मोरे हे ट्रॅक्टर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर आई सुनीताबाई ही शेतात मजुरी करून घराला हातभार लावते. या दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा .नेहा त्यांची मोठी मुलगी.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
आई-वडिलांना सतत कष्ट करत बघत असताना नेहमी नेहा म्हणायची मला माझ्या आई-वडिलांचे कष्ट दूर करायचे आहेत. त्या जिद्दीने तिने स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. दहावीपर्यंतचे शिक्षण तिने पिलखोड येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण रा.वी. कॉलेज चाळीसगाव येथे पूर्ण केले.
नोकरीच्या स्वप्नांनी आणि जिद्दीने ती नाशिक येथे पुढील शिक्षणासाठी आली. कधी वडापाव तर कधी डब्बा तर कधी जे मिळेल ते खाऊन दिवस काढू लागली आणि विविध प्रकारच्या लहान मोठ्या स्पर्धा देण्याची तयारी ठेवली. त्यातच,मुंबई पोलीस परीक्षेचा फॉर्म भरला. त्यासोबत बीएसएफचा फॉर्म भरला. दिवस-रात्र अभ्यास..मैदानी सराव करत होती. शेवटी काल निकाल लागला आणि नेहा ही उत्तम मार्कांनी मुंबई पोलीस परीक्षा पास झाली. तिचं स्वप्न पूर्ण झालं.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
आई-वडिलांचा आनंद गगनाला भिडला. यासोबतच ती चार दिवसांपूर्वी बीएसएफचा निकाल लागला .त्यात सुद्धा ती अतिशय उत्तम मार्काने पास होऊन तिचे सिलेक्शन झाले होते. जेव्हाही बातमी गावात पसरली की, नेहा मोरेचा सिलेक्शन झालं तर सर्व गावकऱ्यांनी नेहाची मिरवणूक काढली. मला अजून इथे थांबायचं नाहीये ,माझी अजून स्वप्न आहेत. अधिकारी होण्याचे स्वप्न मी पूर्ण करणार आहे. मी माझ्या समाजाचे, माझ्या नातेवाईकांचे तसेच माझ्या गुरुजनांचे, पाठीशी खंबीर उभे राहणारे माझे आई-वडील, माझे काका काकू ,माझे भाऊ-बहीण. ज्यांनी ज्यांनी मला वेळोवेळी शैक्षणिक सहाय्य केले. त्यांची देखील मी कायम ऋणी राहील. मला या निमित्ताने देशसेवेची संधी मिळाली ती मी प्रामाणिक करेल, असे नेहा अभिमानाने सांगते आहे. नेहामोरे हिच्या पुढील प्रवासाला एमडी टीव्ही आणि कर्तव्यदक्ष पोलीस परिवाराच्या शुभेच्छा !
दिलीप साळूंखे. एम.डी.टी.व्ही. न्युज धुळे.