नेर : पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन संपन्न..

0
227

नेर : १३/३/२०२३

धुळे तालुक्यातील नेर येथे गांधी चौक येथे पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन करण्यात आले .
तसेच विधान परिषदेचे लोकप्रिय मा. आमदार अमरीशभाई पटेल यांच्या आमदार विकास निधीतून

आणि धुळे ग्रामीणचे पाणीदार आमदार बाबासाहेब कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेर येथे गांधी चौकात कामास मंजुरी मिळाली आहे.


पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. भूमिपूजन कार्यक्रम रविवार दि.12 मार्च रोजी सकाळी 10 वा. उत्साहात पार पडला.

गांधी चौक हा नेर गावासाठी महत्त्वाचा असून या चौकात ब्लॉक बसविल्याने येथील रहिवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

त्याचप्रमाणे गांधी चौकाच्या सुशोभीकरणात खऱ्या अर्थाने या कामामुळे भर पडणार आहे.

या कार्यक्रमाला नेर जि.प.सदस्य आनंद पाटील,सरपंच गायत्रीदेवी जयस्वाल,उपसरपंच जाकीर तांबोळी,प स सदस्य प्रतिनिधी मांगु मोरे,सुमीत जयस्वाल,राजधर अमृतसागर,आबा वाणी,नाना बोढरे,साहेबराव सोनवणे,योगेश गवळे,नारायण बोढरे,वसंत मोरे,भिमराव पाटील,बाळु सोनवणे,धनराज बोरसे,आनंद खलाणे,बापु गवळे,विशाल देशमुख,विजय जैन,यांच्यासह नेर येथील प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी ब्लॉकच्या कामासाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल आमदार अमरीश भाई पटेल यांचे जि. प. सदस्य आनंद पाटील यांनी आभार मानले.

दिलीप साळुंखे,धुळे तालुका प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज

ner dilip salunkhe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here