नेर जि प शाळा : विद्यार्थ्यांनी अनुभवलं चांद्रयान 3 प्रक्षेपण

0
205

नेर/ धुळे 15/7/23

धुळे तालुक्यातील नेर येथील महादेव वस्तीतील जिल्हा परिषद शाळेत भारताचा महत्त्वकांक्षी चांद्र मोहीम प्रकल्प चांद्रयान तीन प्रक्षेपण विद्यार्थी शिक्षकांसह पालकांनी अनुभवलं.. काल दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान तीनने अवकाशात झेप घेतली.. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी विविध शालेय उपक्रम देशभरात विविध शाळा महाविद्यालयातून राबवण्यात आले.. टीव्हीच्या माध्यमातून या चिमुकल्यांना थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी लाभली.. प्रक्षेपण सोहळा पाहिल्यानंतर मुख्याध्यापक राम पाटील व योगेश कोळी यांनी या मोहिमेची माहिती विशद केली.. विद्यार्थ्यांच्या शंका व प्रश्नांचे निरसन केले ..

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

हे हि वाचा :

NASHIK :शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न ..

Nandurbar… अर्हत प्रतिष्ठानतर्फे आयोजित खासदार चषक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन…!

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, श्रीहरीकोटा येथील इस्रोच्या संशोधन केंद्रातून झालेल्या या चांद्रयानाच्या यशस्वी प्रयोगाबद्दल विद्यार्थ्यांना अवगत करावे, भावी संशोधक निर्माण होण्यास मदत व्हावी या हेतूने जिल्हा परिषद शाळेने हा उपक्रम राबवला.. प्रत्यक्ष अनुभूतीतून हे प्रक्षेपण पाहण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील समाधान व्यक्त केले.. यावेळी पालक देविदास सावळे, शिवाजी पाटील शांताराम सावळे, शोभा पाटील, भागा सावळे, दगडू कराड यांचे सहकार्य लाभले होते.. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.. शालेय जीवनात अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात भर घालण्यासाठी केलेला हा प्रयत्न आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हे कौतुकास्पद ठरावे असेच म्हणावे लागेल..
दिलीप साळुंखे, धुळे तालुका प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज धुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here