कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा नवा ट्विस्ट निर्माण होताना दिसून येत आहे. आता बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने भाजप-शिंदे गट आणि ठाकरे गट हे तीन पक्ष एकत्रित रित्या नवीन पॅनल जाहीर करण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादीसह जनसुराज्य पक्षासोबत पॅनेल जाहीर केल्याने ठाकरे गट हा नाराज झाला होता. आज सकाळी ११ वाजेपर्यंत त्यांनी अल्टिमेटम देखील दिला होता. तर दुसरीकडे भाजप शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये एकत्रितरीत्या पॅनल उभारण्याच्या जोरदार हालचाली सध्या सुरू झाल्या असल्याचे राजकीय गोटातून चर्चिले जात आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मात्र, याबाबत भाजपाने भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही. आता भाजपसोबत शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाडगे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सत्यजित आबा सरूडकर, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी, प्राध्यापक जयंत पाटील, भाजप किसान मोर्चाचे भगवान काटे यांच्यात सुरू असलेल्या बैठका नवीन पॅनल जाहीर करण्याचे संकेत देत आहेत.
सारिका गायकवाड. एम.डी.टी.व्ही. न्युज जिल्हा प्रतिनिधी, कोल्हापूर.